
2025 TVS Apache RTR 310 झाली लाँच
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक बेस्ट बाईक म्हणजे TVS Apache, जिचे अनेक व्हेरिएंट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे. नुकतेच अपडेटेड TVS Apache RTR 310 लाँच झाली आहे.
TVS Motor Company ने भारतीय बाजारात आपली अत्याधुनिक स्ट्रीट बाइक – 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 लाँच केली. “रायडर-फर्स्ट” या तत्त्वज्ञानावर आधारित ही बाईक अधिक कार्यक्षम, स्टायलिश आणि तंत्रज्ञानाने समृद्ध आहे. चार दशकांच्या रेसिंग वारशावर आधारित असलेली ही बाईक ताकद, अचूकता आणि नियंत्रण यांचे परिपूर्ण मिश्रण सादर करते.
ही बाईक OBD2B मानकांनुसार सुसज्ज असून, रिअल टाइम एमिशन मॉनिटरिंग, वेगवान प्रतिसाद देणारे इंजिन, व नेक्स्ट-जेन मल्टी-लँग्वेज UI/UX क्लस्टरसह येते. यामुळे रायडरला अधिक इंट्युटिव्ह आणि इमर्सिव्ह राइडिंग अनुभव मिळतो. तसेच, या बाईकमध्ये शाश्वततेचा आणि नाविन्याचा उत्कृष्ट मिलाफ पाहायला मिळतो.
काय सांगता ! चक्क ‘ही’ Electric Bike घरबसल्या ॲमेझॉनवर मिळेल, खास 20 हजारांची सवलतही उपलब्ध
2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 ही फॅक्टरी कस्टमायझेशन ऑफर करणारी या क्षेत्रातील पहिली मोटरसायकल ठरली आहे. टीव्हीएस बिल्ट-टु-ऑर्डर (BTO) प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक आपल्याला हवे तसे पर्याय निवडू शकतात. डायनॅमिक प्रो किट अंतर्गत कीलेस राइड सिस्टम, लाँच कंट्रोल व ड्रॅग टॉर्क कंट्रोल ही वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.
या क्षेत्रातील अनेक पहिले प्रयोग या बाईकमध्ये करण्यात आले आहेत:
टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम व्यवसाय प्रमुख विमल सुंबली म्हणाले, “2025 च्या अपाचे आरटीआर 310 द्वारे आम्ही आधुनिक तंत्रज्ञान, स्टाईल आणि रायडर-केंद्रित अनुभवांचे नवीन पर्व सुरू करत आहोत.”
ही बाईक 35.6 PS @ 9,700 rpm व 28.7 Nm @ 6,650 rpm देणारी असून याच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत: