फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सुसाट वाढताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या योग्य बजेटमध्ये उत्तम फीचर्स आणि रेंज देणाऱ्या कार ऑफर करत असतात. तसेच, सरकार सुद्धा देशातील EV विक्री वाढावी म्हणून ग्राहकांना सबसिडी देत आहे. मात्र, देशात फक्त बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार्सनाच मागणी आहे असे नाही. देशात लक्झरी इलेक्ट्रिक कार्सना सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. चला, भारतातील काही महागड्या आणि लक्झरी इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कारमध्ये पहिले नाव रोल्स-रॉइस स्पेक्टरचे येते. ही रोल्स-रॉइसची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 7.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 102 किलोवॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे. यात एआय-इंटिग्रेटेड इंटरफेस आणि हँड क्राफटेड इंटीरियर सारखी उत्तम फीचर्स आहेत. ही कार केवळ इलेक्ट्रिक वाहन नाही तर एक सायलेंट पॉवरहाऊस आहे जी उत्तम लक्झरीचा अनुभव देते.
‘ही’ कंपनी 3 नवीन एसयूव्ही लाँच करून मार्केट गाजवण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स
लोटस एलेट्रे ही एक हाय-परफॉर्मन्स असलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 2.99 कोटी रुपये आहे. ती 112 किलोवॅट क्षमतेची बॅटरीसह येते आणि कंपनीचा दावा आहे की ती एका चार्जवर सुमारे 600 किलोमीटर धावू शकते. यात ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम (ADAS) आणि OLED डिस्प्ले सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
तिसऱ्या क्रमांकावर पोर्श टायकन टर्बो आहे, जी याच्या स्पोर्टी डिझाइन आणि जबरदस्त स्पीडसाठी ओळखली जाते. याची किंमत 2.44 कोटी आहे. यात 93.4 किलोवॅट प्रति तास बॅटरी आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. ही कार फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग घेऊ शकते.
BMW i7 M70 xDrive ची किंमत 2.50 कोटी रुपये आहे. यात 101.7 kWh बॅटरी आहे, जी 650 bhp पॉवर आणि 1015 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 3.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी स्पीड वाढवू शकते. ज्यांना सुरळीत ड्रायव्हिंग, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि फ्यूचरिसिटिक टेक्नॉलॉजी एकत्र हवे आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम निवड आहे.
Hyundai, Tata की Maruti? जून 2025 मध्ये कोणती Sub-4 मीटर एसयूव्ही होती नंबर 1?
पाचव्या क्रमांकावर Mercedes-Maybach EQS 680 आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 2.68 कोटी रुपये आहे. ही एक लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे जी फक्त 4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी स्पीड वाढवू शकते.