नव्या रंगरूपात Yamaha MT-15 लाँच, आता ग्राहकांना मिळणार अत्याधुनिक फीचर्स
भारतीय मार्केटमध्ये नवनवीन बाईक लाँच होताना दिसत आहे. यातही बाजारात विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात, ज्यात बजेट फ्रेंडली बाईकसोबतच स्ट्रीट बाईकला सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक ऑफर करतात. Yamaha ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी. नुकतेच कंपनीने एक अपडेटेड बाईक ऑफर केली आहे.
यामाहा मोटरने भारतात 2025 Yamaha MT-15 व्हर्जन 2.0 लाँच केली आहे. या लोकप्रिय स्ट्रीट-नेकेड बाईकमध्ये नवीन फीचर्स तसेच नवीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. उत्तम परफॉर्मन्स देणारी बाईक शोधणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन कंपनीने ही अपडेट केली आहे. चला या बाईकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहक अक्षरशः तरसलेत, August 2025 मध्ये होणार लाँच
नवीन MT-15 मध्ये व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्युएशनसह समान 155cc, लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन वापरले आहे. हे इंजिन 18.4 पीएस पॉवर आणि 14.1 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे गिअर शिफ्टिंग अधिक चांगले करते आणि डाउनशिफ्ट दरम्यान अतिरिक्त नियंत्रण देते.
यात कलरफुल TFT स्क्रीन आहे, जी आता टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनला सपोर्ट करते. यामाहा वाय-कनेक्ट ॲपद्वारे स्क्रीन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह कनेक्ट केली जाऊ शकते. यात आता पार्किंग स्थान, रिअल-टाइम इंधन वापर, बाईक खराबी सूचना, रेव्ह डॅशबोर्ड आणि रायडर रँकिंग सिस्टम यासारख्या गोष्टी दर्शवते. आता त्यात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे, जे बाईकला निसरड्या रस्त्यावर ग्रिपिंगमध्ये मदत करते.
तरुणांना लक्षात घेऊन ही बाईक तीन नवीन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे, जे आइस स्टॉर्म, व्हिव्हिड व्हायलेट मेटॅलिक आणि मेटॅलिक सिल्व्हर सायन आहेत. सध्याच्या पॅलेटमधील मेटॅलिक ब्लॅक रंग देखील ऑफर केला जात आहे.
Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर
2025 यामाहा एमटी-15 व्हर्जन 2.0 च्या सिग्नेचर डेल्टा बॉक्स फ्रेमवर विकसित केली आहे, जी सुधारित हँडलिंग आणि कॉर्नरिंग स्थिरतेसाठी ओळखली जाते. MotoGP-प्रेरित ॲल्युमिनियम स्विंगआर्ममध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
2025 यामाहा एमटी-15 ही दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाईनसह येणारी एक लोकप्रिय स्ट्रीट नेकेड बाइक आहे. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – स्टॅंडर्ड (एसटीडी) आणि डिलक्स (डीएलएक्स). ग्राहकांना स्टॅंडर्ड व्हेरिएंटमध्ये मेटॅलिक ब्लॅक रंग पर्यायात ही बाईक 1,69,550 रुपयांना मिळते, तर Metallic Silver Cyan रंगासाठी किंमत 1,70,600 रुपये द्यावी लागेल, जी डार्क मॅट ब्लूच्या तुलनेत 1,050 रुपयांनी जास्त आहे.
डिलक्स व्हेरिएंटमध्ये ही बाईक तीन आकर्षक रंग पर्यायांमध्ये ऑफर केली जाते. आईस स्टॉर्म डीएलएक्स, व्हिव्हिड व्हायोलेट मेटॅलिक डीएलएक्स आणि मेटॅलिक ब्लॅक डीएलएक्स. या तिन्ही रंगांमध्ये एक्स-शोरूम किंमत 1,80,500 रुपये असून ती स्टॅंडर्ड व्हेरिएंटच्या तुलनेत 6,250 रुपयांनी जास्त आहे.