JSW Motors Partners With AWS For Connected Car Data (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज असलेल्या JSW Motors यांची आता टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातही मोठी तयारी सुरू केली आहे. कंपनीने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत पार्टनरशिप केली असून, आपल्या Connected Car Platform, Cloud Platform आणि India Data Storage सुविधांसाठी भारतातील सर्व्हरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवस्थेत टाटा एलेक्सी (Tata Elxsi) आणि एअरटेल (Airtel) यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे Vehicle Data Security आणि कस्टमरच्या माहितीवर नियंत्रण ठेवण्यावर कंपनीचा भर दिसत आहे.
कारचा डेटा भारतातच राहणार
या पार्टनरशिपनुसार, जेएसडब्ल्यू मोटर्सच्या कनेक्टेड कार सिस्टिममधून तयार होणारा डेटा भारतात असलेल्या AWS सर्व्हरवर स्टोअर केला जाणार आहे. यामध्ये गाडी चालवण्यासंबंधीची माहिती, लोकेशन डेटा तसेच कारमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून रेकॉर्ड होणाऱ्या व्हिडिओ फुटेजचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या डेटाची मालकी आणि त्यावरील नियंत्रण जेएसडब्ल्यू मोटर्सकडेच राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू
टाटा एलेक्सी आणि एअरटेलचीही साथ
या संपूर्ण टेक्नोलॉजी सिस्टिममध्ये भारतीय कंपन्यांची महत्त्वाची भूमिका असेल. गाडी आणि क्लाउड प्लॅटफॉर्म यांच्यात कनेक्शन तयार करणारे टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट स्थानिक पातळीवर विकसित करण्यासाठी जेएसडब्ल्यू मोटर्सने टाटा एलेक्सीशी पार्टनरशिप केली आहे. तर गाड्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी एअरटेलकडे असेल. यामुळे गाडीतील विविध सिस्टिममधून मिळणारी माहिती क्लाउडपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.
डेटा प्रायव्हसीसाठी भारतीय कायद्यांचे पालन
आजच्या कनेक्टेड कारमध्ये ड्रायव्हिंग पॅटर्न, गाडीचे लोकेशन आणि केबिनमधील हालचालींसारखी माहिती जमा केली जाते. त्यामुळे या माहितीची सुरक्षितता हा ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी महत्त्वाचा विषय बनला आहे. JSW मोटर्सच्या म्हणण्यानुसार, डेटाचे व्यवस्थापन कंपनीच्या सुरक्षा धोरणांसोबतच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा 2023 यानुसार केले जाईल.
पहिल्या कारच्या लाँचपूर्वी मोठी तयारी
जेएसडब्ल्यू मोटर्सची पहिली पॅसेंजर कार छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे. या पहिल्या कारच्या टेक्नोलॉजी आर्किटेक्चरचा महत्त्वाचा भाग म्हणून Connected Car Platform काम करणार आहे. म्हणजेच कंपनी केवळ कारचे प्रोडक्शन करण्यावर नाही, तर डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि डेटा सुरक्षेवरही फोकस करत आहे.
Ans: जेएसडब्ल्यू मोटर्सने आपल्या Connected Car Platform साठी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत पार्टनरशिप केली आहे.
Ans: कंपनीच्या कनेक्टेड कारमधून तयार होणारा ड्रायव्हिंग डेटा, लोकेशन माहिती आणि कॅमेरा फुटेज भारतातील AWS सर्व्हरवर स्टोअर केले जाणार आहे.
Ans: टाटा एलेक्सी टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट (T-Box) विकसित करण्यासाठी मदत करणार आहे. तर एअरटेल वाहनांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे.






