
New Hyundai Elantra 2027 Hybrid Sedan Revealed (फोटो सौजन्य-AI एआय)
New Hyundai Elantra 2027, Hyundai Elantra Hybrid आणि 157 PS Hybrid Sedan या नवीन मॉडेल्सची लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये एन्ट्री झाली आहे. ह्युंदाईने आपल्या एलांट्रा सेडानची 8th Generation सादर केली असून यामध्ये नवीन डिझाइन, मोठी केबिन, सुधारित सेफ्टी फीचर्स आणि आधुनिक टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या कारची उत्तर अमेरिकेतील विक्री 2027 च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, नवीन हायब्रीड इंजिनमुळे ही सेडान जास्त आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.
नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 1.6-लिटर पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने एकत्रित 157 PS पॉवर निर्माण करते. यासोबत 6-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन मिळते. दुसरा ऑप्शन 2.0-लिटर पेट्रोल इंजिनचा असून ते 149 PS पॉवर देते. या इंजिनसोबत IVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. पेट्रोल व्हर्जनसाठी कंपनीने 35 mpg मायलेजचा दावा केला आहे.
डिझाइनच्या बाबतीत नवीन एलांट्रामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कारची लांबी 85 mm आणि रुंदी 30 mm ने वाढली आहे. व्हीलबेसमध्येही 30 mm वाढ करण्यात आली आहे. यामुळे मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना जास्त जागा मिळते. मागच्या प्रवाशांसाठी 993 mm लेगरूम आणि 958 mm हेडरूम देण्यात आले आहे. Art of Steel या डिझाइन थीमअंतर्गत लांब बोनेट, उठावदार फेंडर्स, H-Edge LED डेटाइम रनिंग लॅम्प्स आणि फ्लश डोअर हँडल्स देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये 12.9-इंचाची Pleos Connect टचस्क्रीन मिळते. ही Android Automotive OS वर आधारित असून OTA अपडेट्स आणि Pleos App Market मधील अॅप्सना सपोर्ट करते. Gleo AI असिस्टंटच्या मदतीने ड्रायव्हरला पार्किंग आणि प्रवासाच्या वेळेनुसार मार्ग निवडता येतो. याशिवाय 2 वायरलेस चार्जिंग पॅड, 100 W USB पोर्ट, Bang & Olufsen ऑडिओ आणि Hyundai Digital Key 2 देण्यात आली आहे.
Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?
सेफ्टीसाठी SmartSense पॅकेजमध्ये Forward Collision-Avoidance Assist 2, Blind-Spot Collision-Avoidance Assist आणि Lane Following Assist 2 यांसारखी फीचर्स आहेत. तसेच ड्रायव्हरची सतर्कता तपासणारी प्रणाली आणि मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी अलर्टही मिळतो. भारतीय लाँचबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.
Ans: या कारमध्ये 1.6-लिटर पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन मिळते. हे इंजिन एकत्रित 157 PS पॉवर निर्माण करते. याशिवाय 2.0-लिटर पेट्रोल इंजिनचा ऑप्शनही आहे.
Ans: या सेडानमध्ये 12.9-इंचाची Pleos Connect टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही Android Automotive OS वर आधारित असून OTA अपडेट्स, अॅप्स आणि Gleo AI असिस्टंटला सपोर्ट करते.
Ans: सध्या भारतातील लाँचबाबत कोणतीही माहिती जाहीर झालेली नाही. उत्तर अमेरिकेत या कारची विक्री 2027 च्या सुरुवातीला सुरू होण्याचे नियोजन आहे.