Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

रेनॉल्टच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने नवीन Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्ट डस्टरच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत.
  • काही महिन्यांपूर्वी नवीन Renault Duster झाली होती लाँच
  • कारच्या डिलिव्हरीला सुरुवात
भारतात अनेक ऑटो कंपन्या लोकप्रिय आहेत. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे Renault. कंपनीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. नुकतेच काही महिन्यांपूर्वी कंपनीने त्यांची लोकप्रिय कार रेनॉल्ट डस्टर एका नवीन अवतारात लाँच केली आहे. विशेष म्हणजे तेव्हापासूनच ग्राहक प्रतीक्षेत होते की या कारची डिलिव्हरी कधी सुरु होणार? अखेर या कारच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे.

नव्या अवतारात सादर झालेली Renault डस्टर आता भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने सध्या टर्बो पेट्रोल व्हेरिएंटच्या डिलिव्हरीला प्राधान्य दिले असून, हायब्रिड मॉडेलसाठी ग्राहकांना नोव्हेंबर 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आधुनिक डिझाइन, सुधारित इंजिन क्षमता आणि प्रगत फीचर्समुळे ही एसयूव्ही मिड-साईज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणार आहे.

Volkswagen Taigun : आता सेफ्टीची चिंता सोडा; 75 टक्के बायबॅक गॅरंटीसह जबराट SUV लॉन्च

रेनो इंडियाने नवीन जनरेशनच्या डस्टरची देशभरात डिलिव्हरी सुरू केल्याने ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आहे. कंपनीने पूर्वीच स्पष्ट केले होते की टर्बो पेट्रोल व्हर्जनची डिलिव्हरी आधी सुरू होईल, तर हायब्रिड व्हेरिएंट पुढील काही महिन्यांत बाजारात येईल. जानेवारी 2026 मध्ये या एसयूव्हीचे कमबॅक झाले, तर 17 मार्च रोजी किंमती जाहीर करण्यात आल्या. जवळपास चार वर्षांच्या अंतरानंतर डस्टरने भारतीय बाजारात दमदार पुनरागमन केले आहे.

किंमत

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, नवीन डस्टरची सुरुवातीची किंमत 10.29 लाख रुपये (एक्स-शोरूम, R-Pass ग्राहकांसाठी) असून सामान्य ग्राहकांसाठी ती 10.49 लाख रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची किंमत 18.29 लाख (R-Pass) ते 18.49 लाख रुपये (सामान्य ग्राहक) इतकी आहे. कंपनीने ऑथेंटिक, इव्होल्यूशन, टेक्नो, टेक्नो प्लस, आयकॉनिक आणि आयकॉनिक लाँच एडिशन अशा विविध व्हेरिएंट्समध्ये ही एसयूव्ही उपलब्ध करून दिली आहे.

डिझाइन

डिझाइनच्या बाबतीत, नवीन डस्टर पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड आणि बॉक्सी लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याचवेळी, जुन्या डस्टरची ओळख कायम ठेवणारे काही घटकही यात जपले गेले आहेत. त्यामुळे आधुनिकता आणि परंपरेचा सुंदर कॉम्बिनेशन या एसयूव्हीत दिसतो.

हायवेवर ओव्हरलोडिंग करणाऱ्यांची खैर नाही! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 15 एप्रिलपासून ‘हे’ नवीन नियम लागू

इंजिन

इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायांमध्येही विविधता देण्यात आली आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या ड्रायव्हिंग गरजांनुसार ग्राहकांना पर्याय मिळतात. सध्या टर्बो पेट्रोल व्हर्जन उपलब्ध असून, हायब्रिड मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

कोणासोबत आहे स्पर्धा?

स्पर्धेच्या दृष्टीने, ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, टोयोटा हायराइडर, फोक्सवॅगन टायगुन आणि स्कोडा कुशाक यांसारख्या लोकप्रिय कार्सशी थेट भिडणार आहे. फीचर्सच्या बाबतीतही डस्टर खूपच प्रगत आहे. यात 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, लेव्हल-2 ADAS, पॉवर्ड टेलगेट आणि 518 लिटरची मोठी बूट स्पेस दिली आहे.

 

 

Web Title: New renault duster delivery starts company will deliver turbo petrol variant first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault

संबंधित बातम्या

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स
1

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु

एका चाकावर ३३१ किमी प्रवास ते पाण्याखाली रायडिंग! गिनीज बुकमधील बाईक रायडिंगचे १० थक्क करणारे विक्रम!
3

एका चाकावर ३३१ किमी प्रवास ते पाण्याखाली रायडिंग! गिनीज बुकमधील बाईक रायडिंगचे १० थक्क करणारे विक्रम!

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक
4

Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.