
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने (TMPV) आज ‘नेक्स्ट जेन टियागो’ बाजारपेठेत दाखल केली. हॅचबॅक कार ग्राहकांना काय देऊ शकते याचा सखोल विचार करून या श्रेणीतील ग्राहकांच्या अपेक्षा उंचावणारे हे सादरीकरण आहे. पेट्रोल, iCNG आणि इलेक्ट्रिक अशा तीनही प्रकारच्या इंजिन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. याच्या आयसीई (पेट्रोल) आवृत्तीची किंमत अवघ्या 4.69 लाख रुपयांपासून, तर इलेक्ट्रिक आवृत्तीची किंमत अवघ्या 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन टियागो ही महत्त्वाकांक्षा, व्यावहारिकता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा एक संगम असून, एकाच समान डिझाईन तत्त्वावर व मूल्यांच्या सामायिक आश्वासनावर आधारित दोन वेगळे मालकी अनुभव प्रदान करते.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा म्हणाले, “लाखो भारतीय कुटुंबांसाठी हॅचबॅक कार आजही वैयक्तिक प्रवासाची पहिली पसंती राहिली आहे. असे असूनही, दीर्घकाळापासून या श्रेणीकडे वाहन उद्योगाने जितके लक्ष द्यायला हवे होते तितके दिले नाही. ‘नेक्स्ट जेन टियागो’ ग्राहकांना अपेक्षेपेक्षा बरेच काही अधिक देऊन हीच गरज पूर्ण करते.
‘नेक्स्ट जेन टियागो’ हा केवळ एक क्रमिक बदल नसून, ते एक पूर्णपणे नवीन संशोधन आहे,असं सांगितलं जातंय. यामध्ये लक्षणीयरीत्या अद्ययावत केलेले बाह्य रूप, कमालीचा प्रीमियम अंतर्गत अनुभव, ब्लाईंड व्ह्यू मॉनिटरसह 360° सराउंड व्ह्यू सिस्टमसारखे प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान आणि एक अधिक मजबूत सुरक्षा पॅकेज देण्यात आले आहे, जे सुरक्षेला चैनीची वस्तू न मानता एक अपरिहार्य गरज मानते. पूर्वी केवळ उच्च श्रेणीतील किंवा महागड्या कारपुरती मर्यादित असलेली वैशिष्ट्ये आणि अनुभव आता एका हॅचबॅक कारच्या मालकाला सहज उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
‘नेक्स्ट जेन टियागो.इव्ही’ इलेक्ट्रिक वाहन मालकीचे आर्थिक गणित पूर्णपणे बदलून या अनुभवाला आणखी पुढे नेते. ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिल्यांदाच दिली जाणारी ‘लाइफटाईम बॅटरी एचव्ही वॉरंटी’, अवघ्या 18 मिनिटांत 100 किलोमीटरची रेंज वाढवणारे प्रगत फास्ट चार्जिंग आणि अवघ्या चार ते पाच वर्षांत वाहनाची संपूर्ण किंमत वसूल करून देणारी दैनंदिन खर्चातील बचत, यामुळे टियागो.इव्ही ही भारतातील पहिली अशी ईव्ही ठरते जी केवळ मनाला भिडणारी नाही तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर आहे. 12 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या आणि ईव्हीचा वापर 2% पेक्षा कमी असलेल्या या श्रेणीमध्ये, हा पर्याय उत्कृष्ट ठरेल.
पेट्रोल, iCNG आणि EV ही तीन वेगवेगळी इंजिन रूपे, दोन वेगवेगळ्या ग्राहक जीवनशैली, परंतु एकच ठाम विश्वास: आधुनिक डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान आणि खरी सुरक्षा हे केवळ उच्च श्रेणीतील वाहनांचे विशेषाधिकार नव्हेत. प्रत्येक भारतीय कुटुंब यापेक्षा अधिक चांगल्या अनुभवासाठी पात्र आहे. ‘नेक्स्ट जेन टियागो’च्या माध्यमातून हे आश्वासन पूर्ण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
नेक्स्ट जेन टियागो ही कार ‘वॉव लुक्स’, ‘वॉव टेक’, ‘वॉव चॉइसेस’, ‘वॉव इकॉनॉमिक्स’ आणि ‘वॉव सेफ्टी’ यांना एकत्र साधत या संपूर्ण श्रेणीला अनेक पावले पुढे नेते, तसेच एका हॅचबॅक कारकडून ग्राहकांनी काय अपेक्षा ठेवाव्यात याची व्याख्याच नव्याने अधोरेखित करते.