Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

निसान मोटर भारतात त्यांची ऑल-न्यू 7-सीटर बी-एमपीव्ही Nissan Gravite नवीन वर्षात आणायची तयारी करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 08:25 PM
2026 मध्ये Nissan Motors भारतात 'ही' 7 सीटर MPV कार ऑफर करणार

2026 मध्ये Nissan Motors भारतात 'ही' 7 सीटर MPV कार ऑफर करणार

Follow Us
Close
Follow Us:
  • निसान कंपनीची मोठी घोषणा
  • नवीन वर्षात नवीन कार आणणार
  • Nissan Gravite असे या कारचे नाव
निसान मोटर इंडियाने भारतासाठी मोठी घोषणा करत 2026 मध्ये नवीन कार्सची सिरीज सादर करण्याची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात आधी ऑल-न्यू ७-सीटर बी-एमपीव्ही निसान ग्रॅव्हाइट (Nissan Gravite) २०२६ च्या सुरुवातीला भारतीय बाजारात दाखल होणार आहे. ही कार निसानच्या भारतासाठी नव्याने आखलेल्या आणि रणनीतिक उत्पादन श्रेणीतील पहिली कार ठरणार आहे.

ग्रॅव्हाइट ही आधुनिक भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली असून, किफायतशीर किंमत, प्रशस्त केबिन आणि बदल करता येणाऱ्या सीटिंग लेआउटसह येणार आहे. जुलै २०२४ मध्ये निसानने ज्या महत्त्वाकांक्षी उत्पादन मोहिमेची घोषणा केली होती, त्यातील ग्रॅव्हाइट हे दुसरे मॉडेल आहे. कंपनीनुसार, २०२६ च्या मध्यात निसान टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला एक नवीन ७-सीटर सी-एसयूव्ही भारतीय बाजारात सादर केली जाणार आहे.

मिनी कूपर घ्यायचा विचार करताय? भारतात सर्वांत स्वस्त कन्व्हर्टिबल ‘Mini Cooper S’ लॉन्च

‘ग्रॅव्हाइट’ नावामागील अर्थ

ग्रॅव्हाइट हे नाव ‘ग्रॅव्हिटी’ या संकल्पनेपासून प्रेरित असून, संतुलन, स्थैर्य आणि मजबूत आकर्षण दर्शवते. भारतीय कुटुंबांना आराम, कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटीचा समतोल अनुभव देण्याचा निसानचा दृष्टिकोन या नावातून व्यक्त होतो.

डिझाइन आणि इंटिरिअर

ग्रॅव्हाइटमध्ये निसानची सिग्नेचर C-आकाराची फ्रंट ग्रिल देण्यात आली असून, त्यामुळे रस्त्यावर कारची ठळक ओळख निर्माण होते. याशिवाय, खास हूड ब्रँडिंग आणि युनिक रिअर-डोअर बॅजिंगमुळे ती आपल्या सेगमेंटमध्ये वेगळी ठरणार आहे.

आतल्या बाजूस, प्रशस्त केबिन, अल्ट्रा-मॉड्यूलर सीटिंग आणि स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन्स देण्यात येणार असून, दैनंदिन वापरासोबतच लांब प्रवासासाठीही ही एमपीव्ही उपयुक्त ठरेल.

भारतामध्ये उत्पादन, नेटवर्कचा विस्तार

ऑल-न्यू निसान ग्रॅव्हाइटचे उत्पादन रेनॉल्ट-निसानच्या चेन्नई येथील सुविधेत स्थानिक पातळीवर केले जाईल. यासोबतच, निसान देशभरात टियर-I आणि टियर-II शहरांमध्ये डीलर नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरेदी आणि सेवा अधिक सुलभ होणार आहे.

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

निसान एएमआयईओचे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना यांनी सांगितले की, भारत निसानसाठी उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. तर, निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांच्या मते, ग्रॅव्हाइट ही भारतीय बाजारपेठेच्या बदलत्या गरजांचे प्रतीक असून, ब्रँडच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रॅव्हाइटच्या फीचर्सबाबत आणि किंमतीविषयी अधिक माहिती कंपनीकडून पुढील काळात जाहीर केली जाणार आहे.

Web Title: Nissan gravite will be launched in indian auto market in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
1

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन
2

‘या’ Car चा दरारा तर बघा! आतापर्यंत 35 लाख युनिट्सपेक्षा जास्त उत्पादन

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार
3

सेफ्टी महत्वाची! ADAS टेक्नॉलॉजी असणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार

देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन
4

देशभरात AI आधारित टोल कलेक्शन सिस्टम येणार? नितीन गडकरी यांनी सांगितला ‘फुलप्रूफ’ प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.