Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवजड वाहनांसह ई-रिक्षाच्या सेफ्टीबाबत Nitin Gadkari यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फरीदाबाद येथे IRTE च्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी रस्ता सुरक्षेबाबतही माहिती दिली. तसेच त्यांनी एक महत्वाची घोषणा देखील केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 24, 2025 | 07:48 PM
अवजड वाहनांसह ई-रिक्षाच्या सेफ्टीबाबत Nitin Gadkari यांनी केली 'ही' मोठी घोषणा

अवजड वाहनांसह ई-रिक्षाच्या सेफ्टीबाबत Nitin Gadkari यांनी केली 'ही' मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

भारतात ज्याप्रमाणे वाहनांच्या संख्येत भर होताना दिसत आहे, त्याचप्रमाणे रस्त्यांवर त्यांची वर्दळ देखील वाढत आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. याच अपघातांच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अनेक प्रयत्न करत असतात.

दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो आणि हजारो लोक जखमी होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या बाबतीत खूप गंभीर आहेत. 24 एप्रिल 2025 रोजी रस्ते वाहतूक शिक्षण संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी काय म्हटले आहे. त्याबाद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Bajaj Pulsar खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी ! ‘या’ तीन मॉडेलवर मिळतेय भरघोस सूट

सर्वाधिक मृत्यू १८ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये होतात

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही भारतात सातत्याने चांगले रस्ते बांधत आहोत, ज्यामध्ये एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. परंतु त्याच वेळी रस्ते सुरक्षेवरही काम करण्याची गरज आहे. जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. दरवर्षी देशात 4.8 लाख अपघात होतात, ज्यामध्ये 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशातील 18 ते 45 वयोगटातील लोकांमध्ये अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू होतात. हे कमी करण्यासाठी, आमचे उद्दिष्ट भारतात सुरक्षित, स्मार्ट आणि सस्‍टेनेबल ट्रान्सपोर्ट साध्य करणे आहे.

ई-रिक्षा आणि जड वाहनांची सेफ्टी टेस्टिंग देखील केली जाईल

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघात कमी करण्याच्या ध्येयात आयआरटीई मदत करत आहे. देशात रस्ते सुरक्षेवर बरेच काम केले जात आहे. भारतात, आम्ही 2023 मध्ये एनसीएपी सुरू केले, त्यानंतर प्रवासी वाहनांची सुरक्षितता सुधारली आहे. आता जगातील सर्वोत्तम वाहने भारतात तयार केली जात आहेत. लवकरच अशाच कार्यक्रमात ई-रिक्षा आणि जड वाहनांचाही समावेश केला जाईल. ई-रिक्षा आणि जड वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच नवीन मानके तयार केली जातील. हे BNCAP च्या धर्तीवर असतील.

Hero, KTM आणि Royal Enfield टेन्शनमध्ये ! येत्या 15 तारखेला लाँच होणार ‘ही’ पॉवरफुल बाईक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातानंतर जखमींना त्वरित उपचार देण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, गोल्डन आवर (अपघातानंतरचा पहिला तास) मध्ये उपचाराअभावी अपघातांमध्ये 30% लोकांचा मृत्यू होतो. लोकांना याबद्दल जागरूक केले जात आहे आणि जखमींना रुग्णालयात नेणाऱ्यांना पूर्वी 5000 रुपये बक्षीस म्हणून दिले जात होते, जे आता 25000 रुपये केले जात आहे. यासोबतच, त्यांनी जखमींना जास्तीत जास्त सात दिवस आणि 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्याबाबतही बोलले.

Web Title: Nitin gadkari made big announcement regarding the safety of e rickshaws along with heavy vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
4

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.