फोटो सौजन्य: @rushlane (x.com)
भारतात अनेक उत्तम बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बजेट फ्रेंडली बाईक्स सोबतच काही डॅशिंग आणि बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक देखील ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी म्हणजे बजाज.
बजाजने देशात चांगल्या बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. पण आता कंपनी आपल्या तीन बाईक्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. याचे कारण म्हणजेच अलिकडेच, बजाज ऑटोने जागतिक स्तरावर पल्सर लाइनअपच्या 2 कोटी युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. हा मोलाचा टप्पा गाठल्यानंतर बजाज ऑटोने पल्सर लाइनअपवर एक नवीन ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, पल्सरच्या काही महत्वाच्या मॉडेल्सवर मोठी सूट दिली जात आहे. बजाज पल्सरच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
बजाज ऑटो पल्सर NS160, NS200 आणि N250 वर दमदार डिस्काउंट मिळत आहे. पल्सर NS160 बेसवर 9,075 रुपये, पल्सर NS200 वर 8,448 रुपये आणि पल्सर N250 वर 9,113 रुपयांची सूट दिली जात आहे.
ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल बाईक्सपैकी एक आहे. यात 160.3cc एअर/ऑइल-कूल्ड 4-व्हॉल्व्ह सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 17.2PS पॉवर आणि 14.6Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात पूर्णपणे LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे स्पीडोमीटर, टॅकोमीटर आणि फ्युएल लेव्हल रिडींग तसेच घड्याळ, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रीडिंग सारखी माहिती देते. हे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येते, जे कॉल आणि एसएमएस अलर्ट, फोन बॅटरी आणि सिग्नल लेव्हल आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी फीचर्स देते.
Hero, KTM आणि Royal Enfield टेन्शनमध्ये ! येत्या 15 तारखेला लाँच होणार ‘ही’ पॉवरफुल बाईक
यात 199 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 24.13 बीएचपी पॉवर आणि 18.74 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात ऑल-एलईडी लाईट्स आणि ड्युअल-चॅनेल एबीएस सारखी फीचर्स आहेत. यात डीआरएलसह नवीन एलईडी हेडलाइट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल डिस्प्ले आहे. हे एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्मार्टफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते. याद्वारे, तुम्हाला बाईकच्या स्क्रीनवर इनकमिंग कॉल्स, मेसेज नोटिफिकेशन्स तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी माहिती मिळेल.
यात 249.07 सीसी एअर/ऑइल-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 24.5 पीएस पॉवर आणि 21.5 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात पूर्णपणे एलईडी लाइटिंग सेटअप आहे. तसेच, एक पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील देण्यात आला आहे, जो स्पीड, ओडोमीटर, फ्युएल लेव्हल, मायलेज याबद्दल माहिती देतो. यासोबतच, कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कॉल व एसएमएस अलर्टसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील मिळते.