फोटो सौजन्य: @insanecreator83(X.Com)
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर केल्या जातात. पूर्वी अनेक जण बाईक खरेदी करताना त्याच्या मायलेजचा विचार करायचे. पण आज ही स्थिती बदलत आहे. आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना हाय परफॉर्मन्स आणि त्याचा दमदार लूक बघत असतात. त्यामुळेच मार्केटमध्ये Hero, KTM आणि Royal Enfield दमदार बाईक ऑफर करत असतात. पण आता मार्केटमध्ये एक नवीन बाईक एंट्री मारण्याच्या तयारीत आहे. चला या नवीन बाईकबद्दल जाणून घेऊया.
Classic Legends पुढील महिन्यात 15 मे रोजी Yezdi Adventure ची अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. या बाईकमध्ये अपडेटेड डिझाइन असेल. क्लासिक लीजेंड्सने गेल्या वर्षी येझदी अॅडव्हेंचरची अपडेटेड व्हर्जन लाँच केली होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपडेटेड इंजिन तसेच डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले होते. विशेषतः फ्युएल टॅंकभोवती मेटल क्रॅश केज देण्यात आला होता. या अपडेट्समुळे या बाईकमध्ये सुधारणा झाली आहे.
Tata Harrier चा बेस व्हेरियंट 2 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केले तर किती असेल EMI?
आता क्लासिक लीजेंड्स त्यांच्या अॅडव्हेंचर बाईकचे आणखी एक अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, या बाईकच्या डिझाइनमध्ये बदल केले जाणार आहे, जे या सेगमेंटमध्ये युनिक असतील आणि तिला एक वेगळी ओळख देण्यास मदत करतील. टेक्निकलदृष्ट्या, बाईकमध्ये 334 सीसी लिक्विड कूल्ड इंजिन असेल, जे 29.6 एचपी पॉवर आणि 29.8 एनएम टॉर्क जनरेट करेल.
येझदी अॅडव्हेंचरची किंमत सध्या रंगानुसार 2.10 लाख ते 2.16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. क्लासिक लेजेंड्स हीच किंमत कायम राहील की यात वाढ होईल? हे पाहणे बाकी आहे. सध्या, येझदी अॅडव्हेंचरची किंमत हीरो एक्सपल्स 210 आणि केटीएम 250 अॅडव्हेंचर आणि रॉयल एनफील्ड हिमालयन 450 दरम्यान आहे.
अन्य एसयूव्हींमध्ये Audi Q3 एवढी खास का ठरते? ‘ही’ आहेत 5 कारणं
येझदी बाईक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करता येतील. यासाठी, दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये पार्टनरशिप केली होती. हा कंपनीच्या डिजिटल धोरणाचा एक भाग आहे, ज्यामुळे ती ग्राहकांचा अनुभव सुधारू इच्छिते. भारतात 50 कोटींहून अधिक जण फ्लिपकार्ट वापरतात. यामुळे नक्कीच कंपनीच्या बाईक्स ग्राहकांपर्यंत सहज पोहचू शकतात.