फोटो सौजन्य: @autox (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स विकल्या जातात. यात सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ग्राहकांमध्ये असणारी हीच डिमांड लक्षात घेत, अनेक ऑटो कंपनी दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करतात. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील दाखल होत आहेत.
देशात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट एसयूव्ही ऑफर करत असतात. त्यातीलच आघाडीची कंपनी म्हणजे मारुती सुझुकी, ज्यांच्या मिड साइझ एसयूव्ही Maruti Grand Vitara ला दमदार मागणी मिळत आहे. आता मारुती सुझुकी ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी एक उत्तम ऑफर देत आहे. ही ऑफर काय आहे आणि ती कशी मिळवता येईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मारुती सुझुकी इंडियाने म्हटले आहे की ते त्यांच्या मिड साइझ एसयूव्हीच्या ग्रँड विटारामध्ये अपग्रेड करण्यासाठी त्यांच्या सध्याच्या ग्राहकांना फायनान्स स्कीम सुरू करण्याची योजना आखत आहेत.
या आगामी आठवड्यात Suzuki E Access होऊ शकते लाँच, Honda Activa E ला मिळणार जोरदार टक्कर
मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे सिनियर एग्जीक्यूटिव ऑफिसर पार्थो बॅनर्जी यांनी पीटीआयला सांगितले की, अपग्रेड करू इच्छिणारे ग्राहक बाजारात उपलब्ध असलेल्या नवीन ग्रँड विटारा फक्त 9,999 रुपयांच्या दरमहा ईएमआयवर खरेदी करू शकतात. जे इतर योजनांपेक्षा सुमारे 20 टक्के कमी ईएमआय आहे. ते म्हणाले की, 5 वर्षांनी किंवा 75,000 किमी नंतर, ग्राहकाकडे वाहनाच्या किमतीच्या 50 टक्के निश्चित मूल्यावर मारुती सुझुकीकडे वाहन परत करण्याचा पर्याय असेल.तसेच, ग्राहकाकडे बाय-बॅक पर्याय देखील असेल.
मारुती सुझुकीच्या मते, ही योजना प्रथम तीन शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. ज्यामध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळुरू सारखी शहरे समाविष्ट आहेत. पार्थो बॅनर्जी म्हणाले की, योजनेच्या यशानंतर कंपनी ही योजना इतर मॉडेल्समध्ये, विशेषतः त्यांच्या आगामी ई-विटारामध्ये वाढवू इच्छिते. ते म्हणाले की, नवीन योजनेनुसार, जेव्हा एखादा ग्राहक ग्रँड विटारामध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा विद्यमान वाहन डाउन पेमेंट बनते आणि ते एक्सचेंज बोनससाठी देखील पात्र असेल
बॅनर्जी म्हणाले की, ग्राहकाला फक्त उर्वरित रक्कमेसाठी वित्त घ्यावे लागेल, जे सुमारे 5 वर्षांच्या कालावधीसाठी सारखेच मासिक हप्ते असतील.
मारुती सुझुकी इंडियाने गेल्या आठवड्यात माहिती दिली होती की, देशात केवळ 32 महिन्यांच्या विक्रमी वेळेत ग्रँड विटाराच्या 3 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.