फोटो सौजन्य: @suzuki2wheelers (X.com)
भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे EVs च्या विक्रीचा आलेख वाढत चालला आहे.
मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना देखील चांगली मागणी मिळते आहे. यात प्रामुख्याने ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करीत आहे. आता लवकरच देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देशात लाँच करणार आहे. Suzuki E Access असे या स्कूटरचे नाव असणार आहे.
Suzuki E Access स्कूटर कोणत्या प्रकारच्या फीचर्स आणि रेंजसह लाँच केली जाईल? या स्कूटरद्वारे कोणाला आव्हान दिले जाईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सुझुकीची ही पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर येत्या 11 जून 2025 रोजी अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. यानंतर या स्कूटरची बुकिंग सुरु केली जाईल.
सुझुकी त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर Suzuki E Access मध्ये अनेक उत्तम फीचर्स देणार आहे. त्यात सुझुकी राइड कनेक्ट अॅप, कलरफुल टीएफटी एलसीडी स्क्रीन, रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स, की-फॉब, मल्टी फंक्शन स्टार्टर स्विच, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, इको, राइड ए, राइड बी आणि ड्रायव्हिंगसाठी रिव्हर्स मोड सारखे अनेक फीचर्स आहेत.
सुझुकी ई अॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.07 किलोवॅट प्रति तास क्षमतेची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आहे. ही बॅटरी पोर्टेबल चार्जरने 6.42 तासांत आणि फास्ट चार्जरने 2 तासांत 0-100 टक्के चार्ज करता येते. याचा टॉप स्पीड ताशी 71 किलोमीटरपर्यंत आहे आणि त्यात बसवलेली बॅटरी 4 किलोवॅट पॉवर आणि 15 न्यूटन मीटर टॉर्क देते. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
या स्कूटरची नेमकी किंमत लाँचिंगच्या वेळीच कळेल. मात्र, अशी अपेक्षा आहे की ही स्कूटर सुझुकी 1 लाख ते 1.10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करेल.
सुझुकीने ही स्कूटर अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केल्यानंतर, ही स्कूटर Honda Activa Electric आणि Honda QC1 तसेच Ather, Ola, Vida सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.