फोटो सौजन्य: @91wheels(X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळू लागली आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. ही वाढती मागणी पाहता, अनेक कंपन्या विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहे. दुचाकी सेगमेंटमध्ये देखील इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला चांगली मागणी मिळताना दिसत आहे.
देशात अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक टू व्हिलर्स लाँच करत आहे. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे Oben Electric. बेंगळुरू स्थित ओबेन इलेक्ट्रिकने आपली विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी एक उत्तम बॅटरी प्रोटेक्शन प्लॅन आणला आहे.
Bajaj Pulsar खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी ! ‘या’ तीन मॉडेलवर मिळतेय भरघोस सूट
कंपनीने या प्लॅनला प्रोटेक्ट 8/80 असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी ही एक अतिशय परवडणारी योजना आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत फक्त 10,000 रुपये निश्चित केली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीवर 8 वर्षे किंवा 80 हजार किलोमीटरचे संरक्षण मिळते. ग्राहकांच्या पहिल्या नवोपक्रमाचा भाग म्हणून, ओबेन इलेक्ट्रिक 1 मे 2025 पासून प्रोटेक्ट 8/80 बॅटरी प्रोटेक्शन प्लॅन ऑफर करण्यास सुरुवात करेल.
या बॅटरी सेफ्टी प्लॅन अंतर्गत, ओबेन इलेक्ट्रिक 8 वर्षे किंवा 80,000 किमी, जे आधी असेल त्याची एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी देत आहे. ओबेनचा नाविन्यपूर्ण प्रोटेक्ट 8/80 प्लॅन हा कम्युटर इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये अशा प्रकारचा पहिलाच प्लॅन आहे. या प्लॅनचा खरा उद्देश ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आहे. नवीन आणि विद्यमान दोन्ही ग्राहक कंपनीच्या प्रोटेक्ट 8/80 प्लॅनचा लाभ घेऊ शकतील. मार्केटमध्ये कंपनीच्या काही बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यातीलच एक बाईक म्हणजे ओबेन रोर EZ. चला या बाईकच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल जाणून घेऊयात.
Hero, KTM आणि Royal Enfield टेन्शनमध्ये ! येत्या 15 तारखेला लाँच होणार ‘ही’ पॉवरफुल बाईक
ओबेन इलेक्ट्रिकने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक बाइक रोअर ईझेडच्या किमती वाढवल्या आहेत. बाईकचे 3.4kWh आणि 4.4kWh क्षमतेचे व्हेरियंट 10,000 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. यात पहिल्याची किंमत 1.10 लाख रुपये आणि दुसऱ्याची किंमत 1.20 लाख रुपये आहे. परंतु, एंट्री-लेव्हल 2.6kWh क्षमतेचे ट्रिम अजूनही 90,000 रुपयांना विकले जात आहे.
रोअर ईझेड गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानासह, या बाईकची आयडीसी रेंज सर्वात मोठ्या बॅटरी व्हेरियंटसाठी 175 किमी आहे. 2.6kWh आणि 3.4kWh क्षमतेच्या व्हेरियंटची आयडीसी रेंज अंदाजे 110 किमी आणि 140 किमी आहे. याशिवाय, फास्ट चार्जरद्वारे 80 टक्के चार्जिंगसाठी 45 मिनिटांपासून ते 1.5 तासांपर्यंत वेळ लागतो.