Oben Electric ची 'ही' बाईक आता FlipKart वरून बुक करता येणार!
भारतातील देशांतर्गत आघाडीची इलेक्ट्रिक बाईक उत्पादक कंपनी Oben Electric ने त्यांच्या लेटेस्ट Rorr EZ Sigma बाईकला आता फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहे.
फ्लिपकार्टसोबतची ही पार्टनरशिप ओबेन इलेक्ट्रिकच्या डिजिटल रिटेल विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कंपनीचे उद्दिष्ट त्यांच्या प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक भारतभरातील ग्राहकांपर्यंत अधिक सुलभ आणि सहजरीत्या पोहोचवणे आहे.
रॉर ईझी सिग्मा फ्लिपकार्टवर ₹1.29 लाखांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध असून, यात ₹17,000 ची सूट समाविष्ट आहे. याचबरोबर, रॉर ईझी मॉडेलची किंमत ₹1.19 लाखांपासून सुरू होते, ज्यामध्ये ₹20,000 ची ऑफर दिली आहे. कंपनीच्या मते, या किंमतींमुळे प्रगत परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यांचा उत्तम संगम साधला गेला आहे.
15 नाही तर 10,000 पगार असणारा व्यक्ती सुद्धा खरेदी करेल TVS Sport बाईक, असा असेल संपूर्ण हिशोब
ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “फ्लिपकार्टवर रॉर ईझी सिग्मा आणि रॉर ईझीची लिस्टिंग आमच्या ‘ऑनलाइन-ऑफलाइन सर्वत्र ग्राहकांपर्यंत पोहोच’ या रणनीतीचा भाग आहे. फ्लिपकार्टच्या विश्वासार्ह प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला आमच्या इलेक्ट्रिक बाईक अधिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी मिळते.”
फ्लिपकार्टचे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्सचे उपाध्यक्ष सुजित आगाशे म्हणाले, “फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी पोर्टफोलिओमध्ये ओबेन इलेक्ट्रिकच्या रॉर ईझी सिग्मा आणि रॉर ईझीचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. अधिकाधिक ग्राहक स्वच्छ आणि किफायतशीर प्रवासाचे पर्याय शोधत आहेत. अशा वेळी फ्लिपकार्टच्या डिजिटल व्यासपीठाद्वारे आम्ही प्रीमियम ईव्ही वाहनांना अधिक सुलभ बनवू इच्छितो.”
आता आली नाही तर लगेच किंमत देखील वाढली! Maruti च्या ‘या’ नवीन SUV च्या किमतीत वाढ
नवीन रॉर ईझी सिग्मा ही लोकप्रिय रॉर ईझीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यात अनेक अपग्रेडेड फीचर्स देण्यात आले आहेत.
प्रमुख फीचर्समध्ये रिव्हर्स मोड, नेव्हिगेशनसह 5-इंच TFT डिस्प्ले, रिअल-टाइम अलर्ट, नवीन इलेक्ट्रिक रेड कलर, आणि कामगिरीला अनुरूप पुनर्निर्मित सीट यांचा समावेश आहे.