फोटो सौजन्य: Gemini
बाईक खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण एक बजेट ठरवत असतात. खरंतर प्रत्येक जण बजेट फ्रेंडली बाईकच्या शोधात असतो. त्यात दिवाळी म्हंटलं की अनेक जण नवीन बाईक खरेदी करताना दिसतात म्हणजे दिसतातच.
जर तुम्ही या Diwali 2025 मध्ये तुमच्या दैनंदिन प्रवासासाठी अशी बाईक शोधत असाल जी केवळ किफायतशीरच नाही तर चांगले मायलेज देखील देईल, तर TVS Sport हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः GST कपातीनंतर आता ही बाईक आणखी स्वस्त झाली आहे. चला त्याची ऑन-रोड किंमत, डाउन पेमेंट आणि EMI प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
आता आली नाही तर लगेच किंमत देखील वाढली! Maruti च्या ‘या’ नवीन SUV च्या किमतीत वाढ
GST कपातीनंतर, TVS Sport ES ची एक्स-शोरूम किंमत आता 55,100 रुपये आहे. जर तुम्ही ही बाईक राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर RTO आणि इंश्युरन्ससह ऑन-रोड किंमत अंदाजे ₹66,948 असेल. ही ऑन-रोड किंमत शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
TVS Sport खरेदी करताना तुम्हाला 5,000 रुपयांचे डाउन पेमेंट द्यावे लागेल. उर्वरित अंदाजे 62,000 रक्कम तुम्ही बाईक लोनद्वारे घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला हे लोन 9% व्याजदराने 3 वर्षांसाठी मिळाले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 2,185 रुपयांचा EMI भरावा लागेल. या लोनचे व्याजदर आणि डाउन पेमेंटची अचूक रक्कम ही तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि संबंधित बँकेच्या धोरणांवर अवलंबून असेल.
कंपनीच्या मते, TVS Sport बाईक प्रति लिटर 70 किमीपेक्षा जास्त मायलेज देते. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ट्विन शॉक ॲपब्झॉर्बर दिले आहेत, ज्यामुळे रायडिंग अधिक आरामदायक होते. या बाईकची टॉप स्पीड 90 किमी प्रति तासांपेक्षा जास्त आहे. ऑटो बाजारात या बाईकची स्पर्धा Hero HF 100, Honda CD 110 Dream, आणि Bajaj CT 110X यांसारख्या बाईक्ससोबत होते. Hero HF 100 मध्ये 97.6 सीसी इंजिन देण्यात आले आहे, ज्याचे अलीकडेच कंपनीने अद्ययावत (updated) रूपात सादर केले आहे.