फोटो सौजन्य: Pinterest
नुकतेच Yamaha XSR 155 भारतात लाँच झाली, जी आता थेट TVS Ronin सोबत स्पर्धा करणार आहे. Yamaha XSR 155 ही तिच्या रेट्रो मॉडर्न लूकमुळे जास्त ओळखली जात आहे. मात्र, TVS Ronin आणि Yamaha XSR 155 मध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.
Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स
Yamaha XSR 155 मध्ये त्याच 155cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे जे यामाहा MT-15 मध्ये आहे. हे इंजिन 18.4 पीएस पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क निर्माण करते. यात यामाहाची VVA (व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्युएशन) टेक्नॉलॉजी आहे, जी सुरळीत पॉवर डिलिव्हरी आणि सुधारित हाय-रेव्हिंग परफॉर्मन्स प्रदान करते.
दुसरीकडे, टीव्हीएस रोनिनमध्ये 225.9 सीसी, ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 20.4 पीएस पॉवर आणि 19.93 एनएम टॉर्क निर्माण करते. याचा अर्थ रोनिन अधिक टॉर्क देते, ज्यामुळे शहरी रायडिंगसाठी ही बाईक अधिक आनंददायी बनते, तर XSR 155 हाय-स्पीड आणि स्पोर्टी रायडिंगसाठी अधिक योग्य आहे.
Kia Seltos चा बाजारात धमाका! १०.९९ लाखांत लाँच झाली ऑल-न्यू जनरेशन SUV; पाहा जबरदस्त फीचर्स
दोन्ही बाईकमधील मुख्य फरक म्हणजे गिअरबॉक्स. यामाहा XSR 155 मध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशन आहे, हे जलद गिअर शिफ्टिंग आणि सुरळीत रायडिंग करण्यास मदत करते. दुसरीकडे, TVS रोनिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे, जो शहरातील ट्रॅफिक रायडिंगसाठी अधिक चांगल्या प्रकारे ट्यून केलेला आहे. XSR 155 मधील गिअरबॉक्स स्पोर्टी फील देतो तर रोनिनचा सेटअप कमी रिव्ह्सवरही आरामदायी टॉर्क देतो.
यामाहा XSR 155 च्या सीट उंची 810 मिमी आहे, जी थोडी उंच मानली जाते. उंच रायडर्ससाठी हे अधिक योग्य आहे. TVS Ronin च्या सीटची उंची 795 मिमी आहे, ज्यामुळे ती लहान रायडर्ससाठी देखील आरामदायी बनते.
ग्राउंड क्लीयरन्सच्या बाबतीत, Ronin चा ग्राउंड क्लीयरन्स 181 मिमी आहे, ज्यामुळे ती खडबडीत भूभागावर देखील आरामदायी बनते. दुसरीकडे, XSR 155 चा ग्राउंड क्लीयरन्स सुमारे 170 मिमी आहे, जे शहर आणि महामार्गावरील रायडिंगसाठी योग्य आहे.
मायलेजच्या बाबतीत Yamaha XSR 155 सुमारे 45 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते, तर TVS Ronin चे सरासरी मायलेज 35 ते 40 किमी प्रति लिटर दरम्यान आहे.
किमतीच्या दृष्टीने पाहता TVS Ronin अधिक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.24 लाख ते 1.59 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर Yamaha XSR 155 ची एक्स-शोरूम किंमत 1.47 लाख रुपये आहे. त्यामुळे Yamaha ही थोडी प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते.
जर तुम्हाला स्पोर्टी राइडिंग, हाय आरपीएमवरील परफॉर्मन्स आणि क्लासिक स्टाइल यांचे कॉम्बिनेशन हवे असेल, तर Yamaha XSR 155 हा योग्य पर्याय आहे. मात्र, जर तुम्ही कम्फर्ट, चांगला टॉर्क आणि रोजच्या वापरासाठी उपयुक्त बाईक शोधत असाल, तर TVS Ronin अधिक योग्य ठरेल. राइडिंग क्वालिटी आणि मेंटेनन्स या दोन्ही बाबतीत Ronin ही अधिक प्रॅक्टिकल बाईक आहे.






