Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईव्हीची डिलिव्हरी लांबवणे ओला इलेक्ट्रिकला पडले महाग! ग्राहकाला पैसे परत आणि ₹1.34 लाखांहून अधिक भरपाई

पूर्ण पैसे भरूनही ईव्हीची डिलिव्हरी झाली नाही, उलट वाहनाचे रजिस्ट्रेशनही झाले! अखेर ग्राहकाने आयोगाकडे धाव घेतल्यानंतर ओला इलेक्ट्रिकला मोठा आर्थिक फटका बसला. कंपनीला पैसे परत करण्यासोबतच भरपाई आणि व्याजही द्यावे लागणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 10, 2026 | 04:43 PM
ईव्हीची डिलिव्हरी लांबवणे ओला इलेक्ट्रिकला पडले महाग! ग्राहकाला पैसे परत आणि ₹1.34 लाखांहून अधिक भरपाई
Follow Us
Follow Us:
  • पूर्ण रक्कम भरल्यानंतरही ग्राहकाला अनेक महिने ओला इलेक्ट्रिक वाहनाची प्रत्यक्ष डिलिव्हरी मिळाली नाही.
  • आयोगाने रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स झाल्याने वाहनाची डिलिव्हरी पूर्ण झाल्याचा कंपनीचा दावा फेटाळला.
  • ग्राहकाला मूळ रकमेसह 12% व्याज, ₹90,000 भरपाई आणि ₹10,000 कायदेशीर खर्च मिळणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग करून पूर्ण पैसे भरल्यानंतरही अनेक महिने वाहनाची डिलिव्हरी न मिळाल्याने एका ग्राहकाला ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावावा लागला. आंध्र प्रदेशातील जिल्हा ग्राहक आयोगाने या प्रकरणात ओला इलेक्ट्रिकला सेवा देण्यात कसूर केल्याचे मानत ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला आहे. आयोगाने कंपनीला भरलेली संपूर्ण रक्कम परत करण्यासोबतच भरपाई आणि खटल्याचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.

बुकिंगनंतरही अनेक महिने डिलिव्हरी नाही

ग्राहकाने ओला रोडस्टर एक्स प्लस इलेक्ट्रिक वाहन बुक केले होते. त्यासाठी 2 ऑक्टोबर 2025 रोजी ₹1,34,161 इतकी पूर्ण रक्कम भरली होती आणि 23 ऑक्टोबर 2025 रोजी डिलिव्हरी अपेक्षित होती. मात्र, ठरलेल्या तारखेनंतरही वाहन मिळाले नाही. ग्राहकाने ईमेल, कस्टमर सपोर्ट आणि कंपनीच्या तक्रार निवारण यंत्रणेशी संपर्क साधला. त्याने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडेही दाद मागितली, तरी डिलिव्हरीचा प्रश्न सुटला नाही.

Ola S1 Z VS TVS iQube! इन-हाउस बॅटरी आणि बजेट किंमतीच्या बाबतीत कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्तम?

रजिस्ट्रेशन झाले, पण वाहनाचा ताबा मिळाला नाही

या प्रकरणातील आणखी महत्त्वाची बाब म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी ओटीपीच्या माध्यमातून वाहनाचे रजिस्ट्रेशन झाल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटशी संबंधित माहिती मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष वाहनाचा ताबा ग्राहकाला देण्यात आला नव्हता. आयोगाने स्पष्ट केले की रजिस्ट्रेशन किंवा इन्शुरन्स झाले म्हणजे वाहनाची प्रत्यक्ष डिलिव्हरी पूर्ण झाली असे मानता येत नाही. ग्राहकाला वाहनाचा ताबा मिळणे हा व्यवहाराचा मुख्य उद्देश आहे.

कंपनीची बाजू आयोगाने फेटाळली

ओला इलेक्ट्रिकने डिलिव्हरीची तारीख अंदाजित असल्याचे सांगत वाहन उपलब्धता आणि सरकारी-नियामक प्रक्रियांमुळे विलंब झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, पूर्ण रक्कम घेतल्यानंतर अनिश्चित काळासाठी डिलिव्हरी पुढे ढकलण्याचे समर्थन या कारणांनी होत नाही, असे आयोगाने नमूद केले. कंपनीला दीर्घ विलंबाचे ठोस दस्तऐवजीकरणही सादर करता आले नाही.

ओलाची नवी S1Z स्कूटर लाँच! ७९,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत इन-हाउस LFP बॅटरीचे तंत्रज्ञान

ग्राहकाला किती पैसे मिळणार?

आयोगाच्या आदेशानुसार ओला इलेक्ट्रिकला ₹1,34,161 ही मूळ रक्कम 2 ऑक्टोबर 2025 पासून वार्षिक 12% व्याजासह परत करावी लागणार आहे. याशिवाय मानसिक त्रास, गैरसोय, उपजीविकेचे नुकसान आणि आर्थिक अडचणींसाठी ₹90,000 भरपाई, तर कायदेशीर खर्चासाठी ₹10,000 देण्याचे आदेश आहेत. म्हणजे व्याजाव्यतिरिक्त कंपनीवर ₹1 लाखांची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. आदेश मिळाल्यानंतर 45 दिवसांत ही रक्कम देणे अपेक्षित आहे.

Web Title: Ola electric ev delivery delay customer compensation consumer court auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Ola

संबंधित बातम्या

Ducati Streetfighter V4: सुपरबाइकची ताकद, नेकेड बाइकचा अंदाज! डुकाटी स्ट्रीटफायटर V4मध्ये काय आहे खास?
1

Ducati Streetfighter V4: सुपरबाइकची ताकद, नेकेड बाइकचा अंदाज! डुकाटी स्ट्रीटफायटर V4मध्ये काय आहे खास?

क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
2

क्रूझ कंट्रोलसह BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध

ब्रिजस्टोन इंडियाच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स! महाराष्ट्रातील दोन स्वयंसेवी संस्था विजेते घोषित!
3

ब्रिजस्टोन इंडियाच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स! महाराष्ट्रातील दोन स्वयंसेवी संस्था विजेते घोषित!

ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर
4

ह्युंदाईने दिल्लीत उघडले 120 kW चार्जिंग स्टेशन; ईव्ही मालकांना मिळणार खास ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.