
फोटो सौजन्य: Gemini
इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola Electric ने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, हेच वर्चस्व कमी करण्यासाठी Ather कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणणार आहे.
Ather Energy भारतात लवकरच एक नवीन आणि किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्कूटरच्या डिझाइनसाठी कंपनीने पेटंट दाखल केले असून ही स्कूटर लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावली आहे. ही नवीन स्कूटर Ather च्या EL01 कॉन्सेप्टवर आधारित असणार असून, सामान्य ग्राहकांचा बजेट लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात येणार आहे. बाजारात Ola सारख्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी Ather ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस
Ather च्या 450 सीरिजमधील स्कूटरमुळे कंपनीला आधीच चांगली ओळख मिळाली आहे. त्यानंतर Ather ने Rizta हा फॅमिली युजसाठी तयार केलेला स्कूटर लाँच केला. अल्पावधीतच Rizta भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये सामील झाला. आता या यशाला पुढे नेत Ather अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्यासाठी आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
Ather EL01 कॉन्सेप्ट प्रथम Ather Community Day 2025 मध्ये सादर करण्यात आला होता. याच कार्यक्रमात कंपनीने आपला नवीन EL प्लॅटफॉर्मही दाखवला होता. त्या वेळी लाँचची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आता डिझाइन पेटंट समोर आल्याने, EL01 हा या नव्या प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला स्कूटर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा स्कूटर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Tata Sierra चा Base Variant खरेदी करण्यात तुमचा फायदा की तोटा? जाणून घ्या
Ather EL01 चा डिझाइन Rizta सारखाच असणार असला, तरी तो अधिक किफायतशीर ठेवण्यात येईल. यामध्ये LED हेडलाइट, पुढील बाजूला स्लिम LED DRL, स्वच्छ आणि स्लीक बॉडी पॅनल, एकाच तुकड्यातील सीट तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी बॅकरेस्ट मिळू शकतो. फ्रंट एप्रनवर इंडिकेटर्स देण्याचीही शक्यता आहे. कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये 7-इंचाची स्क्रीन दाखवण्यात आली होती, जी रायडरला आवश्यक माहिती पुरवेल. एकूणच हा स्कूटर Rizta चा अधिक स्वस्त आणि सोपा अवतार असू शकतो.
Ather EL01 मध्ये फ्लोअरबोर्डखाली बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. हा नवीन EL प्लॅटफॉर्म 2 kWh ते 5 kWh पर्यंतच्या बॅटरीला सपोर्ट करणार आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे बॅटरी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर या स्कूटरची रेंज सुमारे 150 किलोमीटरपर्यंत असू शकते.