Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. त्यात आता बजेट 2026 मध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम EVs वर होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 06:15 AM
फोटो लौजन्य: Pinterest

फोटो लौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारताचा अर्थसंकल्प सादर
  • या निर्णयामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होण्याची शक्यता
  • जाणून घ्या अधिक माहिती
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी Budget 2026 सादर केला. यावेळी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सेक्टर संदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

ही सूट कायम ठेवण्याचा निर्णय

Budget 2026 मध्ये सरकारने लिथियम-आयन बॅटरी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमशी संबंधित कच्च्या मालावर दिली जाणारी कस्टम ड्यूटीवरील सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील EV मॅन्युफॅक्चरिंग आणि क्लीन एनर्जी ट्रान्झिशनसाठी मोठा टप्पा मानला जात आहे.

Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

अर्थमंत्री यांनी सांगितले की, लिथियम-आयन सेल्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅपिटल गुड्सवर दिली जाणारी बेसिक कस्टम ड्यूटी सूट पुढेही सुरू राहील. ही सूट आता केवळ इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटर्‍यांपुरती मर्यादित न राहता, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टममध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन सेल्सनाही लागू होईल. सरकारच्या मते, यामुळे देशांतर्गत बॅटरी उत्पादनाला चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच EV सेक्टरचा खर्च घटेल, ज्याचा सकारात्मक परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींवर होऊ शकतो.

EV इंडस्ट्री मजबूत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल

Union Budget 2026 मध्ये टॅरिफ सूट कायम ठेवणे हे सरकारच्या त्या धोरणाचे द्योतक आहे, ज्याअंतर्गत इलेक्ट्रिक मोबिलिटीला देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवले जात आहे. लिथियम-आयन बॅटऱ्या EV इंडस्ट्रीचा कणा मानल्या जातात आणि त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उपकरणांवर करसवलत दिल्याने गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा भारत वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल करत असून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी स्टोरेजवर विशेष भर दिला जात आहे.

क्रिटिकल मिनरल प्रोसेसिंगसाठीही करसवलत

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की, भारतात क्रिटिकल मिनरल्सच्या प्रोसेसिंगसाठी आवश्यक कॅपिटल गुड्सच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्यूटी सूट दिली जाईल. यामागचा उद्देश देशांतर्गतच आवश्यक खनिजांच्या प्रक्रिया क्षमतेचा विकास करणे हा आहे.

Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

बायोगॅस ब्लेंडेड CNG ला मोठी करसवलत

बजेट भाषणात अर्थमंत्री यांनी बायोगॅस ब्लेंडेड CNG संदर्भातही महत्त्वाची घोषणा केली. आता बायोगॅस ब्लेंडेड CNG वर सेंट्रल एक्साइज ड्यूटीची गणना करताना बायोगॅसच्या संपूर्ण मूल्याला वगळण्यात येईल. या निर्णयामुळे बायोगॅस आधारित इंधन स्वस्त होईल आणि स्वच्छ ऊर्जेला अधिक चालना मिळेल.

स्वच्छ ऊर्जा आणि आत्मनिर्भरतेवर सरकारचा भर

Budget 2026 मध्ये EV सेक्टर, बॅटरी स्टोरेज आणि बायोगॅस यांसारख्या क्षेत्रांना दिलेल्या सवलतींवरून स्पष्ट होते की, सरकार स्वच्छ ऊर्जा, आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकास यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.

Web Title: Budget 2026 electric cars like nexon punch can get cheaper due to decision on ev batteris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Budget
  • budget 2026
  • electric car

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.