! 'या' कंपनीचे Electric Scooter आता फक्त 50,000 रुपयात घरी आणता येणार
सणासुदीची चाहूल लागली की अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार डिस्काउंट ऑफर करत असतात. अशीच एक अफलातून डिस्काउंट ऑफर इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी Ola Electric देत आहे. खरंतर देशात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यामुळेच ही ओलाची ही ऑफर ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.
ओला इलेक्ट्रिकने भारतीय ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मंगळवारी कंपनीने ओला सेलिब्रेट्स इंडिया ही त्यांची नवीन मोहीम सुरू केली. या खास सणाच्या ऑफर अंतर्गत, ग्राहक फक्त 49,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या निवडक ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल खरेदी करू शकतात. ही ऑफर 23 सप्टेंबर 2025 पासून फक्त नऊ दिवसांसाठी वैध असणार आहे.
काय सॉलिड लूक आहे राव! BMW ची ‘ही’ लिमिटेड एडिशन बाईक लाँच, पहिल्यांदाच किंमत 3 लाखांपेक्षा कमी
कंपनीने स्पष्ट केले आहे की या योजनेअंतर्गत दररोज मर्यादित संख्येतच युनिट्स उपलब्ध असतील. ग्राहकांना हे युनिट्स प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मिळणार आहे. यासाठी, ओला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज विशेष शुभ वेळेचे स्लॉट जाहीर करत आहे. याचा अर्थ असा की जर ग्राहकांनी योग्य वेळी बुकिंग केले तर ते अत्यंत कमी किमतीत ओला ई-स्कूटर किंवा बाईक घेऊ शकतात. कंपनी म्हणते की ही केवळ सवलतीची ऑफर नाही तर प्रत्येक भारतीय घरात जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणण्याचे उद्दिष्ट आहे.
ही ऑफर ओलाच्या नुकत्याच पार पडलेल्या संकल्प इव्हेंटनंतर लगेचच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कंपनीने अनेक नवे स्कूटर्स सादर केले होते. त्यात S1 Pro+ (5.2 kWh बॅटरी) आणि Roadster X+ (9.1 kWh बॅटरी) यांचा समावेश आहे, ज्यांची डिलिव्हरी नवरात्रीपासून सुरू झाली आहे. याशिवाय ओलाने एक नवा स्पोर्ट्स स्कूटर S1 Pro Sport लॉन्च केला असून, त्याची किंमत ₹1,49,999 ठेवण्यात आली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी जानेवारी 2026 पासून सुरू होईल.
सध्या ओला इलेक्ट्रिककडे ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कंपनी सध्या S1 सीरिज स्कूटर्स आणि Roadster X बाईक लाइनअप यांच्या माध्यमातून 81,999 रुपयांपासून 1,89,999 रुपयांपर्यंतचे मॉडेल्स ऑफर करत आहे.