Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईकवरून पडण्याच्या भीतीला टाटा बाय बाय करा! ‘या’ देशात लाँच झाली जगातील पहिली सेल्फ बॅलन्सिंग बाईक

एका नवी स्टार्ट अप कंपनीने एक भन्नाट बाईक बाजारात आणली आहे. OMO X असे या बाईकचे नाव असून ही जगातील पहिली बाईक आहे, जिला स्वतःचा तोल सांभाळता येतो.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य: www.omoway.com

फोटो सौजन्य: www.omoway.com

Follow Us
Follow Us:
  • OMOWAY OMO X ही जगातील पहिली सेल्फ बॅलन्सिंग बाईक
  • विशेष टेकनॉलॉजीचा केलाय वापर
  • ‘या’ देशात झाली लाँच
अनेकदा जेव्हा आपण दुचाकी चालवण्यास शिकत असतो तेव्हा सर्वात महत्वाचे म्हणजे ती चालवताना योग्य बॅलन्स राखणे. कित्येक जणांना हा बॅलन्स राखता येत नाही ज्यामुळे त्यांच्या मनात नेहमीच बाईक चालवताना भीती निर्माण होत असते. याच गोष्टीकडे लक्ष देत एका स्टार्टअप कंपनीने जगातील पहिली सेल्फ बॅलन्सिंग बाईक लाँच केली आहे, ज्यामुळे आता बाईकवरून पडण्याची भीती नाहीशी होणार आहे.

अनेक लोकांना दुचाकी चालवण्याची भीती वाटते, कारण त्यांना योग्य बॅलन्स करणे कठीण जाते. अशा व्यक्तींसाठी, ‘OMOWAY’ या कंपनीने ‘OMO X’ नावाची एक विलक्षण इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. ही जगातील अशी पहिलीच इलेक्ट्रिक बाईक आहे, जी आपोआप स्वतःचा बॅलन्स राखते.

नवीन TATA Harrier EV झाली लाँच! 5 स्टार सेफ्टीसहा मिळणार आधुनिक फीचर्स, जाणून घ्या किंमत

एक दोन-चाकी ‘मोबाईल रोबोट’

ही कंपनी या वाहनाकडे केवळ एक बाईक म्हणून न पाहता, एक ‘रोबोट’ म्हणून पाहते; कारण हे वाहन स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम आहे. यामध्ये प्रगत सॉफ्टवेअर आणि सेन्सर्स बसवण्यात आले आहेत, जे बाईकच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवून असतात. तुम्ही बाईक स्टँडवर लावली नाही, तरीही कोणत्याही बाह्य आधाराशिवाय ती स्वतःच्या बळावर ताठ उभी राहू शकते.

स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर

या बाईकवरून रायडर पडू नये म्हणून अत्यंत प्रगत कंट्रोल मोमेंट गायरॉस्कोप ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. हीच टेक्नॉलॉजी स्पेसक्राफ्ट आणि सॅटेलाइट्सना अवकाशात स्थिर ठेवण्यासाठी वापरली जाते. या डिव्हाइसच्या मदतीने बाईक स्वतःहून सरळ उभी राहते, त्यामुळे बॅलन्स राखणे अधिक सोपे होते.

बाईक्स चालवण्याची आवड आहे? मग Passionate Bikers साठी कमवण्याची संधी! कशी? जाणून घ्या

रायडर्ससाठी मोठा फायदा

नवीन रायडर्स किंवा कमी वजनाच्या व्यक्तींना जड बाईक सांभाळताना अनेकदा भीती वाटते. मात्र, या बाईकमुळे ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यावर वारंवार पाय खाली ठेवण्याची गरज भासणार नाही. बाईक कितीही जड असली तरी तिचे सेल्फ-बॅलन्सिंग सिस्टम तिला पडू देत नाही. या बाईकची चाचणी हलणाऱ्या Wobble Board वरही घेण्यात आली होती आणि तिथेही ती पूर्णपणे स्थिर उभी राहिली.

  नवीन TATA Harrier EV झाली लाँच! 5 स्टार सेफ्टीसहा मिळणार आधुनिक फीचर्स, जाणून घ्या किंमत

लाँच कधी आणि कुठे?

कंपनी ही बाईक एप्रिल 2026 च्या शेवटी इंडोनेशियामध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करणार आहे. अधिकृत launchमे 2026 च्या अखेरीस जकार्ता बाजारात होणार आहे. रस्त्यावर येण्याआधीच या बाईकने चांगली लोकप्रियता मिळवली असून, तिच्या आकर्षक डिझाइनसाठी तिला 2026 iF डिझाइन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Omoway omo x is the worlds first self balancing bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
3

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
4

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.