Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol vs CNG vs Hybrid vs EV?: कार खरेदीपूर्वी हे नक्की वाचा! पेट्रोलपासून EVपर्यंत कोणता पर्याय तुमचे पैसे वाचवेल?

Petrol vs CNG vs Hybrid vs EV? : आज कार खरेदी करताना पेट्रोलसोबत CNG, स्ट्रॉंग हायब्रीड आणि इलेक्ट्रिक असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 4 मीटरपेक्षा लहान क्रॉसओव्हरमध्ये सध्या पेट्रोल, CNG आणि EV पर्याय मिळतात; मात्र स्ट्रॉंग हायब्रीडसाठी मोठी आणि महागडी कार घ्यावी लागते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 08, 2026 | 12:54 PM
Petrol vs CNG vs Hybrid vs EV? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Petrol vs CNG vs Hybrid vs EV? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Tata Punch पेट्रोलची सुरुवात 5.69 लाख, तर CNGची 6.79 लाख रुपयांपासून.
  • Punch EVची किंमत 9.69 लाखांपासून; कंपनी 468 किमी रेंजचा दावा करते.
  • Maruti Victoris Strong Hybridची सुरुवात 16.43 लाखांपासून असून 28.65 kmpl मायलेजचा दावा आहे.
आज गाडी घ्यायची म्हटलं की पूर्वीसारखं फक्त पेट्रोल आणि डिझेल एवढाच पर्याय नाहीतर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुम्हाला साधं पेट्रोल हवं असेल तर आहेच, परंतू कंपनीने फिटेड CNG पण खूप चांगला पर्याय झाला आहे, चार्जिंग न करता चालणारी स्ट्रॉंग हायब्रीड गाडी सुद्धा आली आहे.आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा तर रोजचा खर्च सगळ्यात कमी आहे.

भारतात सध्या 4 मीटर पेक्षा लहान अशी कोणतीही स्ट्रॉंग हायब्रीड क्रॉसओव्हर मिळतच नाही. छोट्या गाडीत पेट्रोल, CNG आणि EV मिळेल, पण हायब्रीड हवी असेल तर तुम्हाला मोठी आणि महागडी गाडी घ्यावी लागते. आम्ही इथे टाटा पंच ला बेस धरून आणि मारुती व्हिक्टोरिस हायब्रीड ला हायब्रीडचा बेंचमार्क धरून ही तुलना केली आहे. Petrol vs CNG vs Hybrid vs EV?

किंमत किती आहे?

पेट्रोलमध्ये टाटा पंच सगळ्यात स्वस्त आहे. तिची सुरुवात 5.69 लाखांपासून होते. त्याच गाडीचा CNG व्हर्जन घ्यायचा असेल तर 6.79 लाख मोजावे लागतात. पंच EV ची किंमत 9.69 लाखांपासून सुरू होते. तिला 40kWh बॅटरी मिळते आणि कंपनी 468 किमी रेंज देते असं सांगते. हायब्रीडमध्ये मारुती व्हिक्टोरिस स्ट्रॉंग हायब्रीड आहे. तिची किंमत 16.43 लाखांपासून सुरू होते. ही गाडी पंच पेक्षा मोठी आहे, त्यामुळे थेट तुलना होऊ शकत नाही. पण हायब्रीड तंत्रज्ञान घ्यायचं असेल तर कमीत कमी किती पैसे मोजावे लागतात हे यावरून कळतं. कंपनी या हायब्रीडला 28.65 किमी प्रति लिटर मायलेज मिळतं असं म्हटले जात आहे.

1. खर्चाचे गणित

इंधनाचा प्रकार किंमत मायलेज / एव्हरेज
पेट्रोल 100 रुपये / लिटर 15 किमी / लिटर
CNG 90 रुपये / किलो 22 किमी / किलो
हायब्रीड 100 रुपये / लिटर 23 किमी / लिटर
EV घरी 8 रुपये / युनिट, बाहेर 18 रुपये / युनिट (80% घरी चार्जिंग) 7 किमी / kWh

2. एका किलोमीटरचा आणि वर्षाचा खर्च (15,000 किमी वार्षिक)

 

पॉवरट्रेन प्रति किमी खर्च 1 वर्षाचा खर्च (15,000 किमी) 5 वर्षाचा खर्च (75,000 किमी)
पेट्रोल 6.67 रुपये 1,00,000 5.00 लाख
CNG 4.09 रुपये 61,400 3.07 लाख
हायब्रीड 4.35 रुपये 65,200 3.26 लाख
EV 1.64 रुपये 24,600 1.23 लाख

नोट: घरी चार्जिंग असेल तर EV चा फायदा सगळ्यात मोठा आहे.

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या..

3. परफॉर्मन्स कोणाचा चांगला?

पॉवरट्रेन परफॉर्मन्स प्लस पॉइंट मायनस पॉइंट
पेट्रोल सोपी आणि टर्बोमध्ये दमदार चालवायला सोपी मायलेज कमी
CNG पंच पेट्रोल 88 PS, CNG वर 73 PS कमी खर्च पॉवर कमी, घाटात / ओव्हरटेकला जाणवतं
हायब्रीड शहरात शांत, स्मूथ, सिग्नलला इंजिन बंद खूप शांत टर्बो सारखा झटका नाही
EV पंच EV 40kWh – 127hp, 0-100 फक्त 9 सेकंदात सगळ्यात फास्ट आणि शांत –

4. तुमच्यासाठी कोणती योग्य?

तुमचं वापर तुमच्यासाठी बेस्ट
वर्षाला 8,000 – 10,000 किमी पेक्षा कमी, बजेट कमी पेट्रोल – टेन्शन नाही, स्वस्त
महिन्याला 1000 किमी+, जवळ CNG पंप आहे, बचत हवी CNG – पॉवरपेक्षा बचत महत्त्वाची
जास्त चालणं गर्दीत, चार्जिंगचं टेन्शन नको, 3 लाख जास्त देऊ शकता हायब्रीड – ऑटोमॅटिक, शांत
घरी / ऑफिसमध्ये चार्जिंग आहे, 12-15 हजार किमी+ चालवता, कमी मेंटेनन्स हवा EV – लाँग टर्मला सगळ्यात फायद्याचा

फायनल: कमी चालवणाऱ्यांसाठी पेट्रोल, जास्त चालवणाऱ्या पण चार्जिंग नसणाऱ्यांसाठी CNG, आणि घरी चार्जिंग असणाऱ्यांसाठी EV बेस्ट डील आहे.

 

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

Web Title: Petrol vs cng vs hybrid vs ev which car will be the best for you in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Car News
  • Electric Cars
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
1

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Entertainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
3

Entertainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
4

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.