Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य! अशा संकटात तुम्ही वाहनातील इंधन कसे वाचवाल?

Middle East मधील संघर्षामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चाना उधाण आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 05:30 PM
PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य!

PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य!

Follow Us
Follow Us:
  • इराण इस्राएल अमेरिका संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य
  • मोदींकडून या संघर्षाची थेट Covid 19 सोबत तुलना
  • अशावेळी, इंधन वाचवण्यासाठी काय कराल?
Middle East मधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे ऊर्जा सुरक्षेबाबतच्या चिंता पुन्हा एकदा बळावल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी एक विधान केले, ज्यामध्ये त्यांनी कोविड-19 चा संदर्भ दिला होता. यानंतर इंटरनेटवर एक नवी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे ‘लॉकडाऊन’सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे का, याविषयी मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधानांचे संबोधन

आपल्या संबोधनादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष आणि कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेले संकट, यांमध्ये तुलना केली. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, या दोन्हीही परिस्थितींमध्ये जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, या युद्धामुळे परिस्थिती दीर्घकाळापर्यंत आव्हानात्मक राहू शकते आणि या वास्तवाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असूनही, भारत लोखंडाची आयात का करत आहे? याचा वाहनांवर काय परिणाम होणार?

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, ज्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून कोविड-19 च्या काळात आव्हानांचा सामना केला, त्याचप्रमाणे या वेळीही आपण एकजूट राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी सावध केले की, काही व्यक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अफवा पसरवू शकतात; त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध आणि दक्ष राहिले पाहिजे.

इतर देशांमधील परिस्थिती कशी?

दरम्यान, इतर देशांमधील घडामोडी अशा संकटांच्या गंभीर परिणामांना अधोरेखित करतात. श्रीलंकेने शाळा आणि अत्यावश्यक नसलेल्या सरकारी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे, बांगलादेशाने शैक्षणिक उपक्रम ऑनलाइन पद्धतीवर वळवले असून, वीजकपात लागू करण्यास सुरुवात केली आहे. इंधनाचा वापर मर्यादित करण्याच्या उद्देशाने, पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘चार दिवसांचा कामाचा आठवडा’ अनिवार्य केला आहे.

या परिस्थितीच्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, आम्ही वाहन चालवण्याच्या अशा काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या वाहनाचे मायलेज सुधारण्यास मदत करू शकतील.

नवीन Car घेतलीये? पहिल्या 3 सर्व्हिसिंग आहेत महत्त्वाच्या; दुर्लक्ष केल्यास बसेल मोठा फटका…

योग्य ड्रायव्हिंग पद्धत अवलंबा

तुमच्या वाहनाचा मायलेज तुमच्या ड्रायव्हिंग स्टाइलवर अवलंबून असतो. तुम्ही कोणत्या गिअरमध्ये आणि किती स्पीडने वाहन चालवत आहात याचा त्यावर थेट परिणाम होतो. ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागतात, पण शक्यतो कार थोडी स्पीड घेताच पुढच्या गिअरमध्ये शिफ्ट करा. कारण कमी गिअरमध्ये जास्त ॲक्सिलरेटर दिल्यास इंधनाचा वापर वाढतो.

एकसारखा वेग राखा

गाडीची स्पीड सतत बदलल्यास फ्यूलचा वापर वाढतो. प्रत्येक वेळी तुम्ही गाडीचा वेग वाढवता तेव्हा इंजिनला जास्त ताकद लावावी लागते आणि त्यामुळे अधिक इंधन खर्च होते. तसेच, विनाकारण स्पीड कमी-जास्त केल्यास इंजिनवरही अतिरिक्त ताण येतो.

इंजिन विनाकारण सुरू ठेवू नका

कार थांबलेली असताना इंजिन सुरू ठेवणे ही सामान्य सवय असली तरी त्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. जर सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार असेल, तर इंजिन बंद करणे अधिक योग्य ठरते. ही छोटी सवय दीर्घकाळात तुमचे बरेच पैसे वाचवू शकते.

Web Title: Pm modi on middle east war situation how to save fuel in vehicle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • automobile
  • Middle East War Impact
  • PM Modi

संबंधित बातम्या

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
1

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
2

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
4

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.