फोटो सौजन्य: @IamKumbi (X.com)
भारतात आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत आहे. ग्राहक देखील इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देताय. ज्यामुळे, अनेक ऑटो कंपन्या जास्तीतजास्त रेंज देणाऱ्या कार मार्केटमध्ये लाँच करत असतात.
भारतात काही लक्झरी कार उत्पादक कंपन्या देखील आहेत, ज्या इलेक्ट्रिक कार ऑफर करतात. नुकतेच, पोर्शने त्यांच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स सेडान Taycan 4S चे ब्लॅक एडिशन भारतीय मार्केटमध्ये लाँच केले आहे. भारतात ही कार 2.07 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. या एडिशनमध्ये कारचा परफॉर्मन्स सारखाच आहे, परंतु एक्सटिरिअर आणि इंटिरिअर भागात काही बदल करण्यात आले आहे, जे या कारला अधिक खास बनवतात. चला, Porsche Taycan 4S ब्लॅक एडिशनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच? BE 6 आणि Creta Electric ला मिळणार जोरदार टक्कर
Porsche Taycan 4S ब्लॅक एडिशनमध्ये 105 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 668 किमी पर्यंतची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या एकत्रितपणे 598 एचपी पर्यंत पॉवर आणि 710 एनएम पर्यंत टॉर्क जनरेट करतात. ही कार फक्त 3.7 सेकंदात 0 ते 100 km/h वेग वाढवू शकते. ही पोर्श इलेक्ट्रिक कार 320 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरसह फक्त 18 मिनिटांत चार्ज होते.
Porsche Taycan 4S ब्लॅक एडिशनमध्ये फ्रंट अॅप्रन, साईड स्कर्ट्स, रिअर डिफ्यूझर, ओआरव्हीएम, बॅज आणि विंडो ट्रिम्सवर हाय-ग्लॉस ब्लॅक फिनिश आहे. हेडलाइट्सना स्मोक्ड फिनिश मिळते आणि व्हाईट पोर्श प्रोजेक्शन पुडल लॅम्प्स देखील मिळतात. यात 21-इंच एरो डिझाइन अलॉय व्हील्स ग्लॉस ब्लॅकमध्ये फिनिश केलेले आहेत.
या कारमध्ये 13 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, जे ब्लॅक, व्हाइट, जेट ब्लॅक मेटॅलिक, आइस ग्रे मेटॅलिक, व्होल्कॅनो ग्रे, डोलोमाइट सिल्व्हर, जेंटियन ब्लू, कार्माइन रेड, प्रोव्हन्स, नेपच्यून ब्लू, फ्रोझनबेरी (गुलाबी), फ्रोझन ब्लू आणि पर्पल स्काय मेटॅलिक आहेत.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Punch CNG होईल तुमची ! किती असेल EMI?
Porsche Taycan 4S ब्लॅक एडिशनचा इंटिरीरर भाग स्टँडर्ड टायकन 4एस सारखाच आहे, परंतु त्यात चार खास अपहोल्स्ट्री पर्याय आहेत, दोन ब्लॅक रेस-टेक्स आणि दोन मोनोटोन लेदर पर्याय आहेत, ज्यापैकी एक ब्लॅक आहे. त्याची ड्युअल-टोन थीम अतिरिक्त किमतीत दिली जात आहे.
ही कार अनेक उत्तम फीचर्ससह भारतात आणण्यात आली आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, ADAS सेफ्टी फीचर्स, 14-वे पॉवर ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स, 4-झोन क्लायमेट कंट्रोल, 710 वॅट 14-स्पीकर बोस साउंड सिस्टम यासारख्या प्रीमियम आणि लक्झरी फीचर्सचा समावेश आहे.