फोटो सौजन्य: @khushiagarwal38 (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. जिथे एके काळी रस्त्यांवर फक्त इंधनावर चालणाऱ्या कार दिसत होत्या. तिथेच आज इलेक्ट्रिक वाहने सुद्धा दिसत आहे. ग्राहक देखील पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. एकंदरीत भारतीय ऑटो बाजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल बनत चालले आहे. आता मार्केटमध्ये Tesla Model Y देखील लाँच झाली आहे.
देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. Maruti Suzuki ही त्यातीलच एक कंपनी. आता हीच कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार कार ऑफर करणार आहे. मारुती सुझुकी येत्या 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही, eVitara लाँच करणार आहे. ही कार गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमध्ये तयार केली जात आहे आणि नेक्सा शोरूमद्वारे विकली जाणार आहे.
काय लूक आहे राव ! 2026 Suzuki GSX-8R झाली लाँच, मिळणार ॲडव्हान्स फीचर्स
ई-विटारा केवळ भारतातच नाही तर जपान, UK आणि युरोपसारख्या जागतिक मार्केटमध्ये देखील निर्यात केली जाईल. या एसयूव्हीमध्ये उत्तम बॅटरी पर्याय,ॲडव्हान्स लेव्हल-2 ADAS, जलद डीसी चार्जिंग दिले जाईल. मारुती सुझुकी ई-विटारा बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
यात मजबूत एसयूव्ही-स्टाइल बॉडी क्लॅडिंग आणि Y-आकाराचे एलईडी डीआरएल आहेत. यात चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि 18-इंच अलॉय व्हील्स आहेत. मागील हँडल सी-पिलरवर आहे आणि चार्जिंग पोर्ट समोर डाव्या बाजूला आहे.
यात ब्राऊन -ब्लॅक रंगाची ड्युअल-टोन थीम आहे. यात प्लेटिंग सेंटर कन्सोल आणि फिक्स्ड ग्लास रूफ आहे. यात 10.1 -इंच टचस्क्रीनसह 2-स्पोक स्टिअरिंग आणि 10.25 -इंच डिजिटल क्लस्टर असेल. यासोबतच, eVitara मध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जर, 360° कॅमेरा, 7 एअरबॅग्ज, लेव्हल-2 ADAS सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.
2025 TVS Apache RTR 310 झाली लाँच, किमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
या कारमध्ये 49 kWh आणि 61 kWh क्षमतेचे दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल. यातील 49 किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमी पर्यंतची रेंज देईल. तर याचा दुसरा बॅटरी पॅक 61 किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यानंतर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. डीसी फास्ट चार्जिंगसह ही कार 45 मिनिटांत 10–80% पर्यंत चार्ज होईल. त्याच वेळी, एसी चार्जरने ही कार घरी चार्ज केल्यावर ही 4.5–9 तासांत पूर्णपणे चार्ज होते.
भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकी ई विटारा लाँच झाल्यामुळे ती Tata Curvv EV, Hyundai Creta Electric, MG ZS EV और Mahindra BE 6 ला चांगली टक्कर मिळणार आहे.