Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कार बाजारातील ‘इमोशनल गेम’! भारतीयांसाठी कार म्हणजे केवळ प्रवास की स्टेटस?

भारतात कार खरेदी हा केवळ तांत्रिक निर्णय नसून सुरक्षा, राष्ट्रीय अभिमान, प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या मानवी भावनांशी जोडलेला एक तीव्र भावनिक सोहळा आहे. म्हणूनच, कार कंपन्या शोरूममध्ये केवळ इंजिन किंवा मशीन विकत नसून, ग्राहकांच्या अपेक्षा ओळखून वाहने विकतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 23, 2026 | 02:56 PM
भारतीय कार बाजारातील ‘इमोशनल गेम’! भारतीयांसाठी कार म्हणजे केवळ प्रवास की स्टेटस?
Follow Us
Follow Us:

भारतात कार खरेदी करणे हा केवळ एक आर्थिक किंवा तांत्रिक निर्णय नाही, तर तो एक भावनिक आणि सोहळा आहेम्हणायला हरकत नाही.. मायलेज, इंजिन क्षमता आणि किंमत या गोष्टी वरवर महत्त्वाच्या वाटत असल्या, तरी पडद्यामागे एक वेगळंच ग्राहक मानसशास्त्र काम करत असतं. भारतीय बाजारपेठेत कार कंपन्या फक्त ‘मशीन’ विकत नाहीत, तर त्या मानवी भावना, आकांक्षा आणि सुरक्षिततेचा भरवसा विकतात.

१. मारुती सुझुकी: ‘निश्चितता‘ आणि मानसिक शांतता

भारतातील सर्वात मोठ्या कार कंपनीचे यश तिच्या तंत्रज्ञानापेक्षा लोकांच्या मानसिकतेवर जास्त अवलंबून आहे. मारुती सुझुकी गाडीपेक्षा ‘मानसिक शांतता’ आणि विश्वासाचा वारसा विकते. “काहीही झाले तरी माझी गाडी सहज दुरुस्त होईल आणि पुन्हा चांगल्या किमतीत विकली जाईल” ही ग्राहकाची भावना रिस्क कमी करते.

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!

२. टाटा मोटर्स आणि महिंद्रा: ‘अभिमान‘ आणि राष्ट्रवाद

गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांमधून ‘सुरक्षितता आणि राष्ट्रीय अभिमान’ विकायला सुरुवात केली आहे. ५-स्टार सेफ्टी रेटिंगच्या जोरावर ग्राहकाला “मी माझ्या कुटुंबाचे रक्षण करत आहे” हे भावनिक समाधान मिळतो. दुसरीकडे, महिंद्रा त्यांच्या थार किंवा स्कॉर्पिओ सारख्या गाड्यांमधून पावर आणि स्टेटस विकते. महिंद्राची कार घेणारा व्यक्ती केवळ प्रवास करत नाही, तर तो रस्त्यावर आपली सत्ता दाखवू इच्छितो.

३. ह्युंडाई आणि किया: ‘प्रगती आणि आधुनिकता‘

मध्यमवर्गासाठी ह्युंडाई किंवा किया ही ब्रँड्स ‘जीवनमानातील प्रगती’ दर्शवतात. पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि अद्ययावत तंत्रज्ञान देऊन या कंपन्या ग्राहकाला आधुनिक आणि यशस्वी असल्याचा फिल देतात. टोयोटासारखा ब्रँड तर पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या दीर्घकालीन विश्वासार्हतेचे प्रतीक बनला आहे.

राणी पद्मिनीचे नाव आणि इटालियन डिझाईन! ८० च्या दशकात बॉलिवूड स्टार्सना वेड लावणारी ‘ही’ कार मुंबईची ओळख कशी बनली?

४. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू: ‘यशाची पावती आणि थरार‘

लक्झरी सेगमेंटमध्ये कार खरेदी केवळ प्रवासासाठी नसते, तर ती एका विशिष्ट जीवनशैलीची घोषणा असते. मर्सिडीज-बेंझ ग्राहकाला ‘प्रतिष्ठा, आदर’ विकते. ही कार समाजाला “मी आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे” हा राजेशाही थाट दाखवून देते.

याउलट, BMW चे मानसशास्त्र ‘परफॉर्मन्स, नियंत्रण आणि आक्रमक यश’ यावर चालते. स्वतः गाडी चालवण्याचा थरार अनुभवणाऱ्या वर्गाला ती आकर्षित करते. थोडक्यात, मारुती सुझुकी जिथे ‘बजेट’ विकते, तिथे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू हे ब्रँड्स उच्च सामाजिक स्थान, स्टेटस यांची विक्री करतात.

कार खरेदी करताना भारतीय ग्राहक ‘स्टेटस’, ‘सुरक्षितता’ आणि ‘पैसा वसूल’ वृत्ती या तीन मुख्य गोष्टींचा शोध घेत असतो. थोडक्यात सांगायचे तर, भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग हा लोखंड आणि इंजिनचा व्यवसाय नसून तो मानवी आकांक्षांचा आरसा आहे. कारच्या बोनेटवर असणारा लोगो हा चालवणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, त्याच्या गरजांची आणि त्याच्या यशाची पावती असतो. कंपन्यांना हे मानसशास्त्र अचूक समजले आहे; म्हणूनच त्या शोरूममध्ये केवळ कार नाही, तर ग्राहकांची ‘स्वप्न’ आणि त्याची ‘ओळख’ विकत असतात.

Web Title: Psychology behind car purchasing of indian customers auto news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • psychology article

संबंधित बातम्या

राणी पद्मिनीचे नाव आणि इटालियन डिझाईन! ८० च्या दशकात बॉलिवूड स्टार्सना वेड लावणारी ‘ही’ कार मुंबईची ओळख कशी बनली?
1

राणी पद्मिनीचे नाव आणि इटालियन डिझाईन! ८० च्या दशकात बॉलिवूड स्टार्सना वेड लावणारी ‘ही’ कार मुंबईची ओळख कशी बनली?

लोखंड नव्हे तर फायबर बॉडी कार! ८० च्या दशकात मारुतीला धडकी भरवणारी ही ‘डॉल्फिन’ भारतीय कार अचानक कुठे गायब झाली?
2

लोखंड नव्हे तर फायबर बॉडी कार! ८० च्या दशकात मारुतीला धडकी भरवणारी ही ‘डॉल्फिन’ भारतीय कार अचानक कुठे गायब झाली?

रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?
3

रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?

कस्टमाईझ आवडीचा रंग देण्यासाठी, कार कंपन्या लाखो रुपये का आकारतात? रंगांची एक्सक्लुझिव्हिटी ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवते? जाणून घ्या
4

कस्टमाईझ आवडीचा रंग देण्यासाठी, कार कंपन्या लाखो रुपये का आकारतात? रंगांची एक्सक्लुझिव्हिटी ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवते? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.