Raj Kumar Rao ने खरेदी केली 'ही' आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी
भारतातील सिनेकलाकारांना नेहमीच आलिशान कारची आवड पाहायला मिळते. म्हणूनच तर त्यांच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक बेस्ट कार पाहायला मिळतात. नुकतेच बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता राजकुमार रावने एक आलिशान कार खरेदी केली आहे.
Raj Kumar Rao त्याच्या उत्तम अभिनय आणि वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. मात्र, आता तो त्याच्याकडील असणाऱ्या Lexus कारमुळे देखील ओळखला जाणार आहे. त्यांच्या कारच्या डिलिव्हरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजकुमार रावने खरेदी केलेल्या कारची माहिती, त्याचे फीचर्स, याचे पॉवरफुल इंजिन आणि किंमत आज आपण जाणून घेऊयात.
September 2025 मध्ये ‘या’ 7 सीटर कारची जोरदार डिमांड, जाणून घ्या टॉप 5 वाहनं
सोशल मीडियानुसार, बॉलिवूड स्टार राजकुमार रावने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे. या कारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माहितीनुसार, रावने खरेदी केलेली कार Lexus LM 350h हायब्रीड आहे, जी लक्झरी एमपीव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे.
Lexus LM350h मध्ये कंपनीने अनेक अत्याधुनिक आणि आलिशान फीचर्स दिले आहेत. या एमपीव्हीमध्ये सीट्ससाठी काळा किंवा पांढरा असा रंग पर्याय उपलब्ध आहे. पुढील भागात 14 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, Apple CarPlay आणि Android Auto ची सुविधा देण्यात आली आहे. तर मागील भागात प्रवाशांसाठी 48 इंचाचा मोठा डिस्प्ले, 23 स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टीम, तसेच फोल्डेबल टेबल, व्हॅनिटी मिरर आणि छोटा फ्रिज यासारखी लक्झरी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात असेल, EMI 5000 पेक्षा कमी
Lexus LM350h ही एमपीव्ही सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत सक्षम आहे. यात लेक्सस सेफ्टी सिस्टम, डायनैमिक रडार क्रूज कंट्रोल, लेन डिपार्चर अलर्ट, स्टेयरिंग असिस्ट, लेन ट्रेसिंग असिस्ट, ऑटोमैटिक हाईबीम, एडेप्टिव हाई बीम सिस्टम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, डिजिटल इनसाइड रियर व्यू मिरर, सेफ एग्जिट असिस्ट, डोर ओपनिंग कंट्रोल, प्री-कॉलिजन सिस्टम व्हीकल डिटेक्शन अशी अनेक अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
या एमपीव्हीमध्ये 2.5-लिटरचे चार सिलिंडर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 192 हॉर्सपॉवर आणि 240 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबतच कारमध्ये CVT गिअरबॉक्स बसविण्यात आला आहे, जो स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देतो.
मिळालेल्या माहितीनुसार, लेक्ससची ही लक्झरी एमपीव्ही भारतीय बाजारात तब्बल 2.15 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.