फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात नेहमीच वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसते. देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार कार ऑफर करत असतात. यातही मोठ्या कुटुंबाची पहिली पसंत ही 7 सीटर कारलाच असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या 7 सीटर कार ऑफर करत असतात. चला जाणून घेऊयात, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या कंपनीच्या कारने ऑटो बाजारात टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे?
भारतीय बाजारात महिंद्रा स्कॉर्पिओ ही एक लोकप्रिय कार आहे. कंपनीच्या या सात-सीटर एसयूव्हीला गेल्या महिन्यात मोठी मागणी आहे. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात या सात-सीटर एसयूव्हीच्या 18372 युनिट्स विकल्या गेल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत 14438 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात असेल, EMI 5000 पेक्षा कमी
देशातील अग्रगण्य वाहन निर्माता मारुती सुजुकी कंपनी सात आसनी पर्यायासह Maruti Ertiga ही कार ऑफर करते. आपल्या सेगमेंटमध्ये ही एमपीव्ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. September महिन्यात या बजेट सेगमेंट एमपीव्हीची देशभरात एकूण 12115 युनिट्स विक्री झाली. तर 2024 मधील याच कालावधीत या कारची 17441 युनिट्स विक्री झाली होती.
वाहन निर्माता टोयोटा कंपनी अनेक वर्षांपासून Innova ही कार ऑफर करत आहे. ही लक्झरी एमपीव्ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय कार मानली जाते. September महिन्यात या कारच्या 9783 युनिट्स विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 8052 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
भारतीय मार्क्वेटमध्ये सात सीटर एसयूव्ही म्हणून Mahindra XUV 700 ची विक्री केली जाते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 9764 युनिट्स विकल्या गेल्या, तर 2024 मध्ये याच कालावधीत तिची 9646 युनिट्स विक्री झाली होती.
गेल्या महिन्यात सर्वाधिक पसंती मिळालेल्या सात सीटर कारच्या यादीत Kia Carens हे देखील नाव समाविष्ट झाले. देशभरात या एमपीव्हीच्या 7338 युनिट्स विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षी याच काळात 6217 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.