Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या

रेनॉल्ट इंडियाने जुलै २०२६ साठी किगर, ट्रायबर आणि क्विड या गाड्यांवर १.२५ लाख रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट जाहीर केला असून यात सर्वाधिक फायदा 'किगर' मॉडेलवर मिळत आहे. हा विशेष डिस्काउंट आगामी सणासुदीच्या काळापूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिला असून नव्या हायब्रिड डस्टरवर कोणतीही सवलत नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 13, 2026 | 07:29 PM
कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रेनॉल्ट इंडियाने जुलै २०२६ या महिन्यासाठी आपल्या प्रमुख गाड्यांवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय गाड्या – किगर, ट्रायबर आणि क्विड वर मॉडेलनुसार भरघोस ऑफर्स देत आहे. यामध्ये रेनॉल्ट ‘किगर’ या एसयूव्हीवर सर्वाधिक म्हणजेच १.२५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे.

हे लक्षात ठेवावे की या ऑफर्स केवळ जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतच वैध आहेत. तसेच, ऑफरची अचूक रक्कम ही राज्य, डीलरशिप आणि वाहनाच्या उपलब्धतेनुसार बदलू शकते. कंपनीने नुकतीच लाँच केलेल्या नवीन जनरेशनच्या ‘डस्टर’वर मात्र कोणताही अधिकृत डिस्काउंट दिलेला नाही.

नवी रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च; नवीन लोगो, सोपे व्हेरिएंट्स आणि आकर्षक किंमत

गाड्यांनुसार मिळणारा डिस्काउंट खालीलप्रमाणे,

रेनॉल्ट किगर

रेनॉल्टच्या लाइनअपमध्ये ‘किगर’ या सब-फोर-मीटर एसयूव्हीवर सर्वात मोठी सवलत दिली जात आहे. केरळमधील ग्राहकांना सर्वाधिक म्हणजेच १.२५ लाख रुपयांपर्यंतचे एकूण फायदे मिळू शकतात; ज्यामध्ये ५०,००० रुपये कॅश डिस्काउंट, ५०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, २५,००० रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बेनिफिट आणि १८,००० रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी बेनिफिट्सचा समावेश आहे. गुजरातमध्ये ग्राहकांना ३०,००० रुपये कॅश डिस्काउंट आणि ४०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये २०,००० रुपये कॅश डिस्काउंट, २५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि सोबत स्क्रॅपेज, लॉयल्टी व रेफरल ऑफर्स उपलब्ध आहेत.

रेनॉल्ट ट्रायबर

या लोकप्रिय ७-सीटर कौटुंबिक कारवर एकूण ६०,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. केरळमध्ये ३०,००० रुपये कॅश डिस्काउंट आणि ३०,००० रुपये एक्सचेंज बोनस दिला जात आहे. गुजरातमध्ये हा एकूण डिस्काउंट ४५,००० रुपयांपर्यंत (२५,००० रुपये कॅश + २५,००० रुपये एक्सचेंज) आहे. महाराष्ट्र सह उर्वरित राज्यांमधील ग्राहक ३०,००० रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह लॉयल्टी, कॉर्पोरेट आणि ग्रामीण ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

रेनॉल्ट क्विड

नुकत्याच अपडेट झालेल्या ‘२०२६ रेनॉल्ट क्विड’च्या नवीन मॉडेलवर निवडक राज्यांमध्ये १५,००० रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. परंतु, जर ग्राहकांना डीलरशिपवर ‘क्विड’चा जुना स्टॉक उपलब्ध झाला, तर त्यावर तब्बल ३०,००० रुपयांपर्यंतचा मोठा कॅश डिस्काउंट मिळू शकतो.

येणारा सणासुदीचा काळ पाहता रेनॉल्टने ही मोठी सवलत दिली आहे. या सणांच्या काळात कंपनी आपली बहुप्रतिक्षित ‘स्ट्राँग हायब्रिड डस्टर’ देखील भारतीय बाजारात आणणार आहे.

Web Title: Renault cars offer of 125 lakks automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • automobile
  • offers
  • Renault

संबंधित बातम्या

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये
1

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
2

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
3

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
4

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.