फोटो सौजन्य: Pinterest
Hyundai कडून मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये विक्री केली जाणारी Creta ही SUV सातत्याने ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये Hyundai Creta च्या सुमारे 2 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ देशभरात दररोज सरासरी सुमारे 550 युनिट्स Creta विकल्या गेल्या, जो या सेगमेंटसाठी मोठा रेकॉर्ड मानला जात आहे.
Hyundai ने उडवली झोप! कंपनीने लॉंच केली ‘ही’ जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल…, लगेच करा बुक
Hyundai Motor India चे MD तरुण गर्ग यांनी सांगितले की, भारतात Hyundai Creta चा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. एका वर्षात 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री हा Hyundai साठी अभिमानाचा क्षण आहे. 2020 ते 2025 या कालावधीत Creta ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे. गेल्या 10 वर्षांच्या प्रवासात Creta चा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, आज ती केवळ एक सक्षम SUV न राहता प्रत्येक प्रवासासाठी विश्वासार्ह साथीदार बनली आहे.
Hyundai Creta मध्ये प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 17-इंच अलॉय व्हील्स, LED हेडलॅम्प्स, LED DRLs, सीक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, शार्क फिन अँटेना, ड्युअल-टोन एक्सटिरिअर व इंटिरिअर, लेदर सीट्स, रिअर विंडो सनशेड, पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल-झोन ऑटो एसी, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, ईको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड्स, तसेच स्नो, मड आणि सॅंड ट्रॅक्शन मोड्सचा समावेश आहे.
Hyundai Creta मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल नॅचरल ॲस्पिरेटेड इंजिन असून ते 115 PS पॉवर आणि 143.8 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरा पर्याय 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा असून त्यातून 160 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क मिळतो. तर तिसरा पर्याय 1.5 लीटर डिझेल इंजिनचा असून ते 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल, IVT, ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DCT चे पर्याय उपलब्ध आहेत.
Hyundai Creta ची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपये पासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.20 लाख रुपयांपर्यंत जाते.






