फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे नेहमीच विदेशी ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी एक मोठे आकर्षण राहिले आहे. येथे वाढत्या वाहन खरेदी क्षमतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादने सादर करत असतात. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या दरवेळी नवनवीन ऑफर्स, फीचर्स आणि डिस्काउंट्स देत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या कार्सवर सवलतीही देण्यास सुरुवात केली आहे. अशातच प्रसिद्ध फ्रेंच कार निर्माता रेनॉल्टने आपल्या लोकप्रिय कारवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केले आहेत. या ऑफरमुळे ग्राहकांना चांगली बचत होण्याची संधी मिळणार आहे. चला, रेनॉल्टच्या या खास ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
तर पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही ! परिवहन मंत्र्यांनी ‘या’ वाहन चालकांना दिला इशारा
जर तुम्ही मे 2025 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही रेनॉल्टच्या जबरदस्त डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकता. रेनॉल्ट इंडियाने Triber, Kiger आणि Kwid सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर 1 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केली आहे. हे डिस्काउंट मर्यादित कालावधीसाठी लागू आहे. आज, आपण क्विडवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घेणार आहोत.
रेनॉल्ट क्विडच्या MY24 मॉडेलवर 1 लाख रुपयांची पूर्ण सूट मिळत आहे, ज्यामध्ये 50,000 रुपयांची कॅश डिस्काउंट सूट समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनी या मॉडेलवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील देत आहे.
Renault Kwid MY25 वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी २०२५ मॉडेलवर फक्त ३५,००० रुपयांची सूट देत आहे, ज्यामध्ये १०,००० रुपयांची रोख सूट समाविष्ट आहे. त्याच वेळी, कंपनी या मॉडेलवर २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.
मार्केटमध्ये नुकतेच लाँच झालेल्या MG Motor Pro EV साठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?
रेनॉल्टने शेतकरी आणि पंचायत अधिकाऱ्यांसाठी ₹ 4,000 पर्यंत अतिरिक्त ग्रामीण डिस्काउंट देखील देऊ केले आहेत. याशिवाय, सध्याच्या रेनॉल्ट ग्राहकांना लॉयल्टी आणि एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत अतिरिक्त फायदे मिळू शकतात.
या सर्व सवलती 31 मे 2025 पर्यंत व्हॅलिड आहेत. परंतु, लक्षात ठेवा की ही ऑफर व्हेरियंट, शहर आणि डीलर स्टॉकवर देखील अवलंबून असते. म्हणून, खरेदी करण्यापूर्वी कृपया स्थानिक डीलरशी खात्री करून घ्या. जर तुम्ही मर्यादित बजेटमध्ये विश्वासार्ह आणि दमदार फीचर्स असणारी कार शोधत असाल, तर रेनॉल्ट क्विडवरील ही डील तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.