तर पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही ! परिवहन मंत्र्यांनी 'या' वाहन चालकांना दिला इशारा
देशात सध्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, आणि त्याचबरोबर वायू प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि इतर घातक वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अशा पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ही वाहने इंधनाऐवजी विजेवर चालत असल्यामुळे त्यांचा प्रदूषणाचा दर कमी असतो. त्यामुळे नागरिकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे.
देशातील व राज्यातील सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन पावले उचलत आहेत. तसेच सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस उत्तम प्रोत्साहन देखील दिले जात आहे. दुसरीकडे, ICE वाहनांसाठी नवीन नियम बनवले जात आहेत. या संदर्भात, आता महाराष्ट्र सरकारने प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात की सदोष आणि वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांना यापुढे पेट्रोल पंपांवर इंधन दिले जाणार नाही.
‘या’ भन्नाट फीचर्समुळेच तर MG Windsor EV Pro इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी ठरते
आढावा बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयावर चर्चा केली. यावेळी म्हणाले की, अनेक वाहन मालक एकतर चुकीच्या पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) बनवत आहेत किंवा बनावट प्रमाणपत्रे वापरत आहेत. अशा परिस्थितीत वायू प्रदूषण अधिक वेगाने पसरत आहे. यासोबतच, राज्याचे एयर क्वालिटी इंडेक्स सतत घसरत आहे.
परिवहन मंत्री म्हणतात की सरकार या वाहनांवर कठोर कारवाई करणार आहे. तसेच त्यांना पेट्रोल पंपांवर इंधन मिळण्यापासून रोखले जाईल. यासोबतच, सरकार आता एक नवीन QR कोड बेस्ड प्रदूषण प्रमाणपत्र सादर करण्याची योजना आखत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहन प्रमाणपत्रांची वैधता त्वरित तपासता येते.
मार्केटमध्ये नुकतेच लाँच झालेल्या MG Motor Pro EV साठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?
यासोबतच, ज्यांच्याकडे व्हॅलिड पीयूसी नाही त्यांना इंधन दिले जाणार नाही. मंत्र्यांच्या मते, येणाऱ्या काळात No PUC, NO Fuel असे कठोर नियम लागू केले जाणार आहे, जेणेकरून तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने थांबवता येतील. याचा थेट फायदा असा होईल की हवेची गुणवत्ता सुधारू शकते. प्रताप सरनाईक म्हणतात की पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ हवा मिळावी म्हणून आपल्याला अशी पावले उचलावी लागतील.