फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कार्सना जबरदस्त मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट फीचर्स असणाऱ्या इलेक्टिक कार ऑफर करत आहे. MG Windsor EV ही इलेक्ट्रिक सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता नुकतेच कंपनीने MG Windsor Pro EV लाँच केली आहे.
एमजी मोटरने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीचे एक नवीन व्हर्जन Windsor EV Pro लाँच केली आहे. ही कार त्यांच्यासाठी खास आहे, जे त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित, स्टायलिश, आणि लॉन्ग देणाऱ्या ईव्हीच्या शोधत आहेत. या कारचे सर्वात मोठे फिचर म्हणजे त्याची 449 किलोमीटरपर्यंतची रेंज, ज्यामुळे ती लॉंग ड्राईव्ह एक उत्तम पर्याय बनते.
अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती
या कारमध्ये तुम्हाला 52.9 किलोवॅट प्रति तासाची मोठी बॅटरी मिळते, जी एका चार्जमध्ये चांगला परफॉर्मन्स देते. जर तुम्ही ही कार EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला त्याची संपूर्ण लोनचे कॅल्क्युलेशन आणि EMI ची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
MG Windsor EV Pro ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीसारख्या शहरात खरेदी केले तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 18.40 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. या किमती वाहनाचे मॉडेल, व्हेरियंट आणि शहराच्या टॅक्स स्ट्रक्चरवर अवलंबून असतात. काही डीलरशिपवर ऑफर देखील उपलब्ध असू शकतात, ज्यामुळे किमतीत काही प्रमाणात घट दिसू शकते.
आता पेट्रोलचा खर्च विसरा ! फक्त 42,000 रुपयात लाँच झाली ही ई-स्कूटर, आजच करून टाका बुक
जर तुम्ही EMI वर MG Windsor EV Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशावर त्याचा कसा परिणाम होईल, त्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले आणि उर्वरित रकमेचे बँकेकडून कर्ज घेतले, म्हणजे तुम्ही सुमारे 13.40 लाख रुपयांचे कर्ज घेतले. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि तुम्हाला बँकेकडून 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने कर्ज मिळाले असेल, तर तुमचा EMI दरमहा सुमारे 28,000 रुपये असेल. या ५ वर्षांच्या कालावधीत, तुम्हाला सुमारे 3 लाख रुपये व्याज देखील द्यावा लागेल. परंतु, वेगवेगळ्या बँकांनुसार आणि तुमच्या CIBIL स्कोअरनुसार व्याजदर बदलू शकतात.