Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायलेजचा बादशाह! डबल CNG सिलेंडरसह मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘ही’ कार, मिळणार अफलातून फीचर्स

भारतात उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक जण CNG कार खरेदी करत असतात. मात्र, आता एक लोकप्रिय कार डबल CNG सिलेंडरसह मार्केटमध्ये येणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 04:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • सीएनजी कारला भारतात चांगली मागणी
  • Renault Triber डबल CNG सिलेंडरसह होणार लाँच
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स मिळावा म्हणून अनेक कार खरेदीदार पेट्रोल कार खरेदी करण्यापेक्षा CNG कार खरेदी करत असतात. या सीएनजी कार पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या नवीन कार लाँच करताना ती सीएनजी व्हर्जनमध्ये सुद्धा लाँच करतात. अशातच आता Renault Triber डबल CNG सिलेंडरसह लाँच होण्याची शक्यता आहे.

फ्रेंच वाहन निर्माता कंपनी Renault ने भारतात आपल्या लोकप्रिय MPV मॉडेल, Renault Triber साठी एक महत्त्वपूर्ण अपडेटेड व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन ट्रायबरमध्ये लवकरच अधिक पॉवरफुल इंजिन आणि नवीन CNG सेटअप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, कंपनीने नुकतेच आपले नवीन RGEP (Renault Group Entry Platform) चे अनावरण केले, जे सध्याच्या CMF-A प्लॅटफॉर्मचीच एक अपडेटेड व्हर्जन आहे.

या नवीन प्लॅटफॉर्मचा वापर Renault Kwid, Renault Kiger आणि Renault Triber यांसारख्या मॉडेल्ससाठी केला जाईल. या सर्व कार्स ज्यामध्ये ‘मिड-लाईफ अपडेट्स’ असतील. कंपनी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्या बाजारात आणण्याची शक्यता आहे.

Mahindra, Tata Motors की Kia, कोणती कंपनी ऑफर करतेय सर्वात स्वस्त डिझेल कार? किंमत…

Renault ने भारतात आपल्या व्यावसायिक कामकाजाचा विस्तार करण्याचे एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. 2030 पर्यंत भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेत 5% हिस्सा काबीज करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. हे साध्य करण्यासाठी, नवीन गाड्या सादर करण्याव्यतिरिक्त, सध्याच्या मॉडेल्समध्येही सुधारणा केल्या जातील; आणि या रणनीतीमध्ये ‘Triber’ हे मॉडेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी Renault ने मोठं लक्ष्य ठरवलं आहे. कंपनी 2030 पर्यंत भारतीय पॅसेंजर वाहन बाजारात 5% मार्केट शेअर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नवीन गाड्या लाँच करण्याबरोबरच सध्याच्या मॉडेल्समध्येही अपडेट्स केले जाणार असून, Renault Triber यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन

रेनो ट्रायबर 2019 मध्ये भारतात लाँच झाली होती आणि किफायतशीर किंमत, 7-सीटर लेआउट आणि प्रशस्त जागेमुळे ती लोकप्रिय ठरली. सध्या या कारमध्ये 1.0-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जातं, जे मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. मात्र, पूर्ण लोडवर या इंजिनची पॉवर कमी पडते अशी अनेक ग्राहकांची तक्रार होती.

ही उणीव भरून काढण्यासाठी कंपनी आता यात नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्याच्या तयारीत आहे. हे इंजिन सुमारे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क देईल. यासोबत मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. नवीन ट्रायबर यावर्षीच्या फेस्टिव्ह सीझनदरम्यान लाँच होण्याची अपेक्षा आहे.

टर्बो इंजिन आणि ड्युअल-CNG कॉम्बिनेशन

भारतामध्ये वाढत्या इंधन दरांमुळे आणि कडक नियमांमुळे CNG कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. सध्या ट्रायबरमध्ये डीलर-लेव्हलवर CNG किट बसवली जाते, जी फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. आता कंपनी फॅक्टरी-फिटेड CNG व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे.

यातील खास बाब म्हणजे अंडरबॉडी ड्युअल-CNG टँक सेटअप, ज्यामुळे बूट स्पेस कमी होणार नाही. नवीन ट्रायबरमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसोबत ड्युअल-CNG पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना जास्त पॉवरसोबतच कमी रनिंग कॉस्टचा दुहेरी फायदा मिळेल.

नवीन प्लॅटफॉर्ममुळे सुधारित फीचर्स

नवीन RGEP प्लॅटफॉर्मवर आधारित ट्रायबरमध्ये अधिक सुरक्षितता, आधुनिक फीचर्स आणि सुधारित ड्रायव्हिंग अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्लॅटफॉर्म विशेषतः CNG टँक खाली बसवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे गाडीची स्पेस आणि प्रॅक्टिकलिटी कायम राहते.

 

Web Title: Renault triber will get double cng cylinder know more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • Renault

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.