Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 चे रिटेल लाँचिंग; साहसी रायडर्ससाठी नवे पर्याय

येझदी आणि बीएसए यांनी त्यांच्या नव्या स्क्रॅम्बलर मोटरसायकलींचे मुंबईत रिटेल लाँचिंग केले असून त्या आता अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहेत. भारतातील सर्वात हलकी 350 सीसी स्क्रॅम्बलर असलेल्या Yezdi Scrambler 350 ची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 09, 2026 | 05:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

येझदी आणि बीएसए यांनी त्यांच्या नव्या स्क्रॅम्बलर मोटरसायकलींचे मुंबईत रिटेल लाँचिंग केले असून या बाइक्स आता अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील रस्ते, लांब पल्ल्याचे हायवे तसेच खडतर मार्गांवर सहज धावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या बाइक्स साहसी रायडर्ससाठी आकर्षण ठरत आहेत.

टाटा मोटर्सने खरेदी केले होते जॅग्वार आणि रेंज रोव्हर हे ब्रॅंड ब्रिटन कडून! आर्थिक मंदीच्या काळातला टाटा मोटर्सचा मास्टरस्ट्रोक!

भारतातील सर्वात हलकी 350 सीसी स्क्रॅम्बलर म्हणून ओळखली जाणारी *येझदी स्क्रॅम्बलर 350* दैनंदिन वापर आणि वीकेंड ट्रिप्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. नव्या लिक्विड-कूल्ड ‘कटार’ इंजिनमुळे या बाइकमध्ये दमदार परफॉर्मन्स, चांगला टॉर्क-टू-वेट रेशो आणि जलद प्रतिसाद मिळतो. या बाइकची सुरुवातीची किंमत 1,99,950 रुपये ठेवण्यात आली आहे.

दुसरीकडे *बीएसए स्क्रॅम्बलर 650* ही भारतातील या सेगमेंटमधील एकमेव 650 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन असलेली मोटरसायकल आहे. दमदार लो आणि मिड-रेंज टॉर्कसह ब्रिटिश स्क्रॅम्बलर स्टाइलिंगचा संगम या बाइकमध्ये पाहायला मिळतो. बीएसएच्या गोल्ड स्टार कॅटालिना, ए10 स्पिटफायर आणि ए65 फायरबर्ड यांसारख्या ऐतिहासिक मॉडेल्सपासून प्रेरित असलेल्या या बाइकची सुरुवातीची किंमत 3,24,950 रुपये आहे.

क्लासिक लेजेंड्सचे सहसंस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितले की, स्क्रॅम्बलर बाइक्समध्ये मोटरसायकलिंग क्षेत्रातील ‘एसयूव्ही’ बनण्याची क्षमता आहे. शहरातील राइडिंगपासून ऑफ-रोड अनुभवांपर्यंत विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या बाइक्स विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईतील रायडर्सना नव्या मार्गांचा शोध घेण्यासाठी या बाइक्स प्रेरित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ग्राहकांना आता मुंबईतील अधिकृत डीलरशिपमध्ये या दोन्ही बाइक्सचा अनुभव घेता येणार आहे. सर्व डीलरशिपमध्ये विक्री, सर्व्हिस आणि आफ्टरसेल्स सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय कंपनीच्या कस्टमर अश्युरन्स प्रोग्रामअंतर्गत 4 वर्षे किंवा 50,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी, 6 वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी, एक वर्षाची रोडसाइड असिस्टन्स सेवा आणि देशभरातील 400 हून अधिक सेल्स व सर्व्हिस टचपॉइंट्सवर सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

या नव्या लाँचिंगमुळे भारतीय स्क्रॅम्बलर सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक वाढण्याची शक्यता असून साहसी मोटरसायकलप्रेमींना दोन नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Web Title: Retail launch of yezdi scrambler 350 and bsa scrambler 650 in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.