फोटो सौजन्य: @royalenfieldpl (X.com)
भारतीय बाजारात बाईक सेगमेंटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आपली वाहने लाँच करत असतात. यातही अनेक ग्राहकांना हाय परफॉर्मन्स आणि आकर्षक लूक असणाऱ्या बाईक जास्त भावतात. सध्या देशात हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर करणाऱ्या अनेक ऑटो कंपन्या आहेत. पण त्यातही सगळ्यात जास्त मागणी ही रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना असते. आज म्हणजेच 27 मार्च 2025 रोजी Royal Enfield ने 650 सीसी सेगमेंटमध्ये नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने क्लासिक 650 एकूण किती किमतीत लाँच केली आहे? त्यात कोणत्या प्रकारे फीचर्स दिले आहेत? या बाईकचे इंजिन किती शक्तिशाली असेल? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
रॉयल एनफील्डने क्लासिक 650 बाईक अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केली आहे. या सेगमेंटमध्ये कंपनी इतर अनेक बाईक्स देखील विकते.
शोरुमध्ये नाही तर ऑनलाईन उपलब्ध असेल ही खास कार, भारतात लवकरच होणार लाँच
रॉयल एनफील्ड क्लासिक 650 मध्ये 648 सीसी क्षमतेचे ट्विन सिलेंडर एअर/ऑइल कूल्ड इंजिन आहे. ज्यामुळे बाईकला 47 हॉर्स पॉवर आणि 52.3 न्यूटन मीटर टॉर्क मिळते. या बाईकमध्ये 14.7 लिटर क्षमतेचे फ्युएल टॅंक आहे. या इंजिनसह बाईकमध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आले आहे.
कंपनीने नवीन बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रिपॉन नेव्हिगेशन, यूएसबी चार्जर, स्लिप अँड असिस्ट क्लच, 18 आणि 19 इंच अलॉय व्हील्स, गिअर पोझिशन इंडिकेटर, एलईडी हेडलाइट, आणि एलईडी टेल लाईट यांसारखे फीचर्स दिले आहेत.
रॉयल एनफील्डने हे तीन व्हेरियंट आणि चार रंगांच्या ऑप्शन्समध्ये लाँच केले आहे. या बाईकचा बेस व्हेरियंट म्हणून हॉटरोड ला Vallam Red कलर देण्यात आला आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.37 लाख रुपये आहे. याचा Burntinghorpe Blue कलर देखील त्याच किमतीत खरेदी करता येणार आहे. यानंतर, क्लासिक व्हेरियंट 3.41 लाख रुपयांना Teal रंगात खरेदी करता येईल. याचा टॉप व्हेरियंट क्रोमला ब्लॅक क्रोम रंगाच्या ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 3.50 लाख रुपये आहे.
Tata च्या ‘या’ कारचे येऊ शकते Facelift Version; टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली कार, मिळाली ‘ही’ माहिती
रॉयल एनफील्ड क्लासिक 650 च्या लाँचिंगसोबत बुकिंग देखील सुरू झाली असून याची डिलिव्हरी एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. ही बाईक ऑनलाइन आणि ऑफलाइन डीलरशिपद्वारे बुक करता येणार आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ६५० ही ६५० सीसी सेगमेंटमध्ये बाजारात लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये, ही बाईक थेट BSA Gold Star 650, Kawasaki Vulcan S तसेच त्यांच्या स्वतःच्या Shotgun 650 आणि Super Meteor 650 बाईक्ससोबत स्पर्धा करेल.