फोटो सौजन्य: @RealMrHowMuch (X.com)
फोक्सवॅगन इंडिया येत्या 14 एप्रिल रोजी टिगुआन नवीन जनरेशनची आर-लाइन कार लाँच करणार आहे, ज्यासाठी कंपनीने अधिकृत बुकिंग सुरू केली आहे. फोक्सवॅगन इंडियाने भारतीय बाजारात Golf GTI MK 8.5 लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीची ही कार ऑनलाइन विकली जाणार आहे, जी तुम्ही शोरूममध्ये जाऊन खरेदी करू शकणार नाही. येत्या आठवड्यात या कारबद्दल अनेक डिटेल्स उघड होणार आहेत.
फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत ही कार लाँच केली जाणार आहे. ही कार सीबीयू मार्गाने भारतात आणली जाईल. ही कार खास असणार आहे याचे कारण म्हणजे फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय पहिल्यांदाच भारतात लाँच होत आहे. ही कार मार्केटमध्ये येताच हवा करणार यात काही वाद नाही.
रोजच्या प्रवासासाठी बजेट फ्रेंडली कारच्या शोधात आहात? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स
ही कार 2.0 लीटर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिनसह येईल, जी खूप शक्तिशाली ठरू शकते. गोल्फ जीटीआयचे हे इंजिन जास्तीत जास्त 261 बीएचपी पॉवर आणि जास्तीत जास्त 370 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ते एका विजेच्या वेगाने चालणाऱ्या 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन युनिटशी जोडले जाईल.
याशिवाय, फोक्सवॅगनची नवीन जनरेशनची टिगुआन आर-लाइन येत्या 14 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. ही फोक्सवॅगन कार 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणार आहे. ही कार ऑल-व्हील ड्राइव्ह मोडमध्ये चालवली जाईल. या वाहनात प्रो अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन देखील बसवता येते.
फोक्सवॅगन टिगुआनच्या या नवीन जनरेशनच्या मॉडेलला नवीन स्टाइल देण्यात आले आहे. ही कार एका आकर्षक लूकसह येणार आहे. याशिवाय, टिगुआनचे इंटीरियर देखील आधुनिक लूकसह येणार आहे. ही कार MQB EVO प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या कारमध्ये 15.1 इंचाची मोठी टचस्क्रीन असणार आहे.