Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत

3 ते 9 डिसेंबरदरम्यान दिल्लीतील ट्रॅव्हनकोर पॅलेसमध्ये 100 पेक्षा जास्त कार्यक्रम रंगणार आहेत. संगीतापासून खाद्यसंस्कृतीपर्यंत आणि हस्तकलेपासून हिमालयीन समुदायांच्या कथांपर्यंत बरंच काही येथे अनुभवता येणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 09:07 AM
रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्डचा सात दिवसांचा हिमालयीन महोत्सव दिल्लीमध्ये 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
  • 100 पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये कला, संगीत, खाद्यसंस्कृती, चित्रपट आणि हिमालयीन हस्तकलेचा अनुभव मिळणार आहे.
  • 45 पेक्षा जास्त ब्रँड्स आणि क्राफ्ट कलेक्टिव्हजसह हिमालयीन समुदायांच्या कथा महोत्सवात मांडल्या जाणार आहेत.
रॉयल एनफिल्ड सोशल मिशनतर्फे ‘Journeying Across The Himalayas 2026’ या सात दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तिसरी आवृत्ती 3 ते 9 डिसेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील ट्रॅव्हनकोर पॅलेस येथे होणार आहे. हिमालयातील कला, संगीत, खाद्यसंस्कृती, चित्रपट, हस्तकला आणि स्थानिक समुदायांचे जीवन जवळून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

यंदाच्या कार्यक्रमाची व्याप्ती मागच्या वर्षापेक्षा जास्त मोठी असून 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये 25 पेक्षा जास्त कला प्रदर्शन व इन्स्टॉलेशन्स, 20 हून जास्त लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स, 20 पेक्षा जास्त खाद्यविषयक कार्यक्रम आणि 50 पेक्षा जास्त वर्कशॉप्स व संवाद सत्रांचा समावेश आहे. हिमालयीन प्रदेशातील 45 पेक्षा जास्त ब्रँड्स आणि क्राफ्ट कलेक्टिव्हजचा ‘Himalayan Bazaar’ देखील यंदा आकर्षण ठरणार आहे.

 

कला आणि स्थानिक समुदायांच्या कथा यंदाच्या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असतील. गौतम पांडे यांचे ‘Before Time’ लडाखमधील प्राचीन शैलचित्रांची माहिती देईल, तर ‘Into the Himalayas’ या व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभवातून स्नो लेपर्डच्या अधिवासाची सफर करता येईल. ‘The Gaddi Suitcase’ मधून गद्दी आणि भंगाली पशुपालक समुदायांच्या परंपरा संगीत, मिनिएचर आर्ट आणि कांगडी लोकसंगीताच्या माध्यमातून मांडल्या जातील.

संगीतप्रेमींसाठी ताबा चाके, रमन नेगी आणि आभा हंजुरा यांचे परफॉर्मन्स असतील. खाद्यसंस्कृतीसाठी ‘Chouka Courtyard’ मध्ये कालिम्पोंग, आसाम, सिक्कीम, शिलाँग, नागालँड आणि हिमाचल प्रदेशातील पदार्थ व चहाच्या परंपरांचा अनुभव मिळेल.

 

यंदाची थीम ‘Becoming’ असून हवामान बदल, स्थलांतर, बदलता भूभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हिमालयीन समुदायांमध्ये होत असलेल्या बदलांवर त्यातून प्रकाश टाकला जाणार आहे. याशिवाय दररोज चित्रपटांचे प्रदर्शनही होणार असून त्याचे क्युरेशन धर्मशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ‘DIFF On the Road’ उपक्रमाद्वारे केले जाईल.

2025 मधील आवृत्तीला 11,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली होती. तसेच 50 पेक्षा जास्त हिमालयीन समुदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रॉयल एनफिल्ड सोशल मिशनने 2030 पर्यंत 100 हिमालयीन समुदायांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता हिमालयातील संस्कृती, पर्यावरण आणि स्थानिक जीवनशैली समजून घेण्याचे व्यासपीठ ठरणार आहे.

Web Title: Royal enfield himalayan festival delhi december 2026 culture music crafts auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • automobile
  • himalaya
  • royal enfield

संबंधित बातम्या

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
1

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.