फोटो सौजन्य: @royalenfield (X.com)
भारतीय मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. विशेषकरून तरुण वर्गामध्ये कंपनीच्या बाईक मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. कंपनीच्या बाईक हाय परफॉर्मन्स आणि उत्तम लूकसाठी ओळखल्या जातात. अशातच जर तुम्ही दररोज अप-डाउनसाठी रॉयल एनफील्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हंटर 350 बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
हंटर 350 कंपनीची सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय बाईक आहे, जी विशेषतः तरुण रायडर्समध्ये पसंत केली जाते. तुम्ही पूर्ण पैसे न देता ही बाईक EMI वर देखील खरेदी करू शकता. या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
दिल्लीमध्ये Royal Enfield Hunter 350 च्या बेस व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 1.73 लाख रुपये आहे. या किंमतीत 1.50 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत, 12,000 रुपये RTO चार्ज , 10,000 रुपयांचा विमा आणि 9,000 रुपये व इतर खर्च समाविष्ट आहेत.
2 लाखाचे डाउन पेमेंट आणि Maruti Suzuki Brezza होईल तुमची, फक्त ‘एवढा’ असेल EMI ?
जर तुम्ही 20,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित रक्कमेसाठी म्हणजेच 1.53 लाख रुपयांचे लोन घ्यावे लागेल. समजा बँक तुम्हाला 9% वार्षिक व्याजदराने 3 वर्षांचे (३६ महिने) कर्ज देते, तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे 5,100 असेल. या लोन पिरियडमध्ये तुम्हाला सुमारे 30,000 व्याज देखील द्यावे लागेल. म्हणजेच, बाईकची एकूण किंमत अंदाजे 2 लाख रुपये असेल. व्याजदर आणि ईएमआय तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि बँकेच्या पॉलिसीवर अवलंबून असेल.
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड आणि फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 20.4 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क निर्माण करते. बाईकला 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. हे मॉडेल शहरातील वाहतूक आणि महामार्गांवर चांगला परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहे.
Renault Triber आणि Kiger Facelift ची होतेय टेस्टिंग, लाँच आगोदरच मिळाली ही महत्वाची माहिती
रॉयल एनफील्ड हंटर 350 चा मायलेज ARAI ने प्रमाणित केलेल्या प्रति लिटर 36 किलोमीटर आहे. यात 13 लिटरचे फ्युएल टॅंक आहे. एकदा ही टाकी भरली की, ही बाईक 450 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 35 किलोमीटर बाईक चालवली तर त्याला सुमारे 12 ते 15 दिवस पुन्हा पेट्रोल भरण्याची गरज भासणार नाही.