फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र काम करत असतात. काही जणांना एकाच वेळी पूर्ण रक्कम जमा करता येत नाही. अशावेळी ते कार लोनच्या साहाय्याने एक ठरावी रक्कम जमा करत महिन्याला EMI भरत असतात.
मार्केटमध्ये अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या बेस्ट एसयूव्ही ऑफर करत आहे. मारुती सुझुकी ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी. मारुती सुझुकीने सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Breeza विकते. जर तुम्हाला या एसयूव्हीचे ऑटोमॅटिक व्हर्जन घ्यायचे असेल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरल्यानंतर, तुम्ही दरमहा किती ईएमआय भरून ही कार घरी आणू शकता, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Renault Triber आणि Kiger Facelift ची होतेय टेस्टिंग, लाँच आगोदरच मिळाली ही महत्वाची माहिती
मारुतीने ZXI व्हेरियंटसह AT ट्रान्समिशनच्या पर्यायात ब्रेझा ऑफर केली आहे. कंपनी या SUV चा ZXI AT व्हेरियंट 12.66 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली असेल तर 12.66 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह त्यावर रजिस्ट्रेशन आणि इंश्युरन्स देखील भरावा लागेल.
ही कार खरेदी करण्यासाठी सुमारे 1.27 लाख रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स आणि सुमारे 47 हजार रुपयांचा इंश्युरन्स भरावा लागेल. याशिवाय, फास्टॅग, एमसीडी, स्मार्ट कार्ड आणि टीसीएस शुल्क म्हणून 18345 रुपये देखील भरावे लागतील. त्यानंतर दिल्लीमध्ये कारची ऑन-रोड किंमत 14.62 लाख रुपये होईल.
जर तुम्ही मारुती ब्रेझाचा ZXI AT व्हेरियंट खरेदी केला तर बँक तुम्हाला फक्त एक्स-शोरूम किमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 12.62 लाख रुपयांची रक्कम मिळवावी लागेल. जर बँक तुम्हाला नऊ टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 12.62 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 20318 रुपयांचा EMI भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने 12.62 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दरमहा 20318 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला मारुती ब्रेझाच्या ZXI AT व्हेरियंटसाठी सुमारे 4.43 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 19.06 लाख रुपये होईल.