फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. यात एसयूव्ही पासून एमपीव्हीचा समावेश आहे. भारतीय ग्राहक देखील आपल्या आवश्यकतेनुसार कार खरेदी करत असतात. भारतीय ऑटो बाजारात विदेशी ऑटो कंपन्या देखील कार्यरत आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. आता लवकरच रेनॉल्ट कंपनी आपल्या दोन नवीन कार लाँच करणार आहे.
फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्ट भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी लवकरच त्यांच्या दोन कारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Renault Triber आणि Kiger च्या फेसलिफ्टबद्दल माहिती समोर आली आहे. या कार कधीपर्यंत लाँच होऊ शकतात, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
‘या’ कारने भल्याभल्या ऑटो कंपन्यांची केली दांडी गुल ! WagonR, Baleno,आणि i20 ला सोडले मागे
रेनॉल्ट भारतात ट्रायबर आणि किगरचे फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसलिफ्ट लाँच करण्यापूर्वी या दोन्ही कारची टेस्टिंग केली जात आहे. टेस्टिंग दरम्यान या कार स्पॉट झाल्या आहेत.
या दोन्ही कार टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पाहिल्या गेल्या आहेत. अलीकडे पाहिलेले युनिट्स देखील पूर्णपणे झाकलेले आहे. नवीन युनिट्सच्या एक्सटिरिअर मध्ये अनेक बदल दिसून आले आहेत ज्यात चौकोनी एलईडी टेल लाइट्स, नवीन बंपर, नवीन टेल लाइट्स समाविष्ट आहेत. रेनॉल्ट कायगर फेसलिफ्टमध्ये मोठी ग्रिल, एलईडी डीआरएल, फॉग लाइट्स देखील दिले जाऊ शकतात.
रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कारमध्ये फक्त कॉस्मेटिक बदल केले जाणार आहे. त्यांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची आशा फारच कमी आहे. त्यामध्ये फक्त सध्याचे एक-लिटर इंजिन पर्याय दिले जातील. ज्यामध्ये मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्याय दिले जातील. या कार पेट्रोल तसेच सीएनजीमध्ये देखील दिल्या जाऊ शकतात.
याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta
रेनॉल्टने अद्याप याबद्दल कोणतीही अनधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, अशी अपेक्षा आहे की रेनॉल्ट पुढील वर्षी या दोन्ही कारचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर करू शकते.
रेनॉल्ट सध्या ट्रायबर आणि किगरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख रुपये देते. अशा परिस्थितीत, या कारच्या फेसलिफ्टच्या किंमतीत फारसा बदल होण्याची आशा कमी आहे. परंतु रेनॉल्ट किंमत काही हजार रुपयांनी वाढवू देखील शकते.