
फोटो सौजन्य: @carandbike/ X.com
रॉयल एनफील्डने त्यांच्या लोकप्रिय Royal Enfield Meteor 350 चे एक स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या नवीन मॉडेलला Meteor 350 Sundowner Orange Special Edition असे नाव दिले आहे. कंपनीने Motoverse 2025 कार्यक्रमात ही बाईक 2.18 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आणि त्याची किंमत स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा 27,649 रुपयांनी जास्त आहे. बुकिंग 22 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होईल.
Honda कडून अचानक Electric Activa बनवणे बंद! यामागील कारण काय? जाणून घ्या
डिझाइनच्या बाबतीत, या स्पेशल एडिशनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा नवीन सनडाऊनर ऑरेंज रंग. यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते. स्टॅंडर्ड मॉडेल आधीच अनेक रंग पर्यायांमध्ये येते, जसे की फायरबॉल ऑरेंज, फायरबॉल ग्रे, स्टेलर मॅट ग्रे, स्टेलर मरीन ब्लू, ऑरोरा रेट्रो ग्रीन, ऑरोरा रेड आणि सुपरनोव्हा ब्लॅक.
Royal Enfield Meteor 350 Sundowner Orange Special Edition मध्ये बेस मॉडेलच्या तुलनेत अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडूनच दिलेली फॅक्टरी-फिटेड टूरिंग सीट, फ्लायस्क्रीन, पॅसेंजर बॅकरेस्ट आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड यात समाविष्ट आहे.
याशिवाय या स्पेशल एडिशनमध्ये अॅल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स, स्लिप-ॲण्ड-असिस्ट क्लच, अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स, LED हेडलॅम्प, तसेच USB Type-C फास्ट चार्जिंग पोर्ट देखील मिळतो.
परफेक्ट फॅमिली कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी ‘या’ आहेत बेस्ट ऑप्शन, किंमत फक्त 4.99 लाखांपासून सुरु
या एडिशनमध्ये इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 349 cc सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 20.2 hp ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. चेसिस, सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअपदेखील पूर्वीच्या मॉडेलसारखेच कायम ठेवण्यात आले आहेत.