फोटो सौजन्य: iStock
भारतीय टू व्हीलर बाजारात Royal Enfield चा एक वेगळाच दबदबा पाहायला मिळतो. यातही कंपनीच्या 350 सीसी बाईक मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तसेच, नवीन जीएसटी दरानुसार या बाईक्सच्या किमतीत घट झाल्याने अनेक जण यंदाच्या दिवाळीत बाईक खरेदीदारीचा प्लॅन बनवत आहे. मात्र, आता कंपनीने त्यांच्या 350 CC बाईकमध्ये एक महत्वाचा बदल केला आहे.
रॉयल एनफिल्डने त्यांच्या 350 सीसी बाईक्समधून गिअर पोझिशन इंडिकेटर तात्पुरते काढून टाकले आहे. कंपनीने म्हटले आहे की हे पाऊल या सेन्सर्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ अर्थ मटेरिअलच्या कमतरतेमुळे उचलण्यात आले आहे. सध्या तरी, या बाईक्समध्ये जुन्या गिअर इंडिकेटर सेटअपमध्येच आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई
रिपोर्टनुसार, सध्या फक्त 350 सीसी रॉयल एनफील्ड बाईक्स गिअर पोझिशन इंडिकेटरशिवाय पाठवल्या जात आहेत. कंपनीच्या डीलर्सना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. खरेदीदारांना कळवले जाईल की ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि दुर्मिळ अर्थ आधारित कंपोनंट्स उपलब्ध होताच गिअर इंडिकेटर पुन्हा इन्स्टॉल केले जाईल. रॉयल एनफील्डच्या 350 सीसी बाईक कंपनीच्या एकूण मासिक विक्रीपैकी अंदाजे 85% आहेत. म्हणूनच, या कंपोनंटच्या कमतरतेमुळे प्रभावित होणारे हे मॉडेल्स पहिले आहेत. 450 सीसी आणि 650 सीसी बाईक्स यामुळे प्रभावित होणार नाहीत.
सामान्यतः गिअर पोझिशन सेन्सरमध्ये मॅग्नेटिक किंवा हॉल-इफेक्ट सेन्सरचा वापर केला जातो, जो शिफ्ट ड्रमच्या स्थितीनुसार गिअरची माहिती देतो. या सेन्सरमध्ये ‘नीओडिमियम (NdFeB)’ सारख्या रेअर अर्थ मॅग्नेटचा वापर केला जातो. याच मॅग्नेट्स किंवा त्यांच्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक चिप्सच्या तुटवड्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी Royal Enfield ने तात्पुरत्या उपाय म्हणून ‘नॅचरल इंडिकेटर’ सिस्टम स्वीकारली आहे. ही सिस्टम अधिक पारंपरिक असून, यात रेअर अर्थ मटेरियलची गरज भासत नाही. यात प्लंजर-टाइप स्विच वापरला जातो, जो गिअर न्यूट्रल स्थितीत आल्यावर डॅशबोर्डवर लाइट दाखवतो.