Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Buying Tips: जुनी कार घेताना घाई नको! इंजिनपासून कागदपत्रांपर्यंत सर्व काही नीट तपासा

Second Hand Car buying Tips: जर तुम्ही देखील सेकंड हँड कार विकत घेताय मग या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 05:04 PM
Tips for first time car buyers, Tips for Car Buyers, First Time Car Buyer,

Tips for first time car buyers, Tips for Car Buyers, First Time Car Buyer,

Follow Us
Follow Us:
  • सेंकड हॅंड कार विकत घेताय?
  • कारचे कागदपत्र चेक करा
  • कारची कंडिशन तपासा
भारतात सेकंड हँड कारचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. सेकंड हँड कार विकत घेणे हा एक स्मार्ट निर्णय असला काही लोकांना सेकंड हँड कार खरेदी केल्याचा पश्चात्ताप होतो. कारण, कार विकत घेताना तरी योग्य काळजी न घेतल्यास नुकसान देखील होऊ शकते. एक चांगली सेकंड हँड कार विकत घ्यायची असेल तर फक्त कारच्या चकाकीकडे नव्हे तर इतर डिटेल्सवर देखील लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही सेकंड-हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या महत्त्वाच्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या

कारची कंडिशन तपासा

कार विकत घेताना सर्वप्रथण कारची कंडिशन चेक करा. सीट फाटलेली किंवा त्यावर डाग आहेत का याची तपासणी करा. तसेच, कारमधले इलेक्ट्रॉनिक फिचर्स व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करा. कारच्या बाहेरील भागावर गंज, रंगाचे नुकसान, डेंट  आणि अलाइनमेंट तपासा. भविष्यातील अलाइनमेंटच्या समस्या टाळण्यासाठी अंडरफ्रेमचे नुकसान आणि टायरची झीज तपासा. गळती, गंज आणि फ्लुइड स्थिती तपासण्यासाठी इंजिन चेक करा. इंजिन हे गाडीचे हृदय असते. हूड उघडून तेलाची गळती होत आहे का ते काळजीपूर्वक तपासा. इंजिन ऑइलचा रंग आणि लेव्हल तपासा. तसेच, कार सुरू करून इंजिनमधून काही असामान्य आवाज येत आहे का ते तपासा. सायलेंसरमधून येणाऱ्या धुराकडे लक्ष द्या. जर निळा किंवा काळा धूर येत असेल, तर ते इंजिनमधील बिघाडाचे लक्षण असू शकते.

टेस्ट ड्राइव्ह

टेस्ट ड्राइव्ह घेतल्याशिवाय कधीही कार खरेदी करू नका. गाडी किमान ५-१० किलोमीटर कार चालवून बघा, ब्रेक लावून बघा, गिअर बदलून बघा आणि कार चालवायला पूर्णपणे आरामदायक आहे याची खात्री करा.

कारचे कागदपत्र चेक करा

कारची कागदपत्रे व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार सर्व्हिस रेकॉर्ड्स चेक करा. आरसी (RC) वर मालकाचे नाव आणि चेसिस नंबर तपासा. त्यानंतर, इंश्योंरस चालू आहे की नाही आणि त्यावर नो-क्लेम बोनस आहे का, हे पाहण्यासाठी विमा तपासा. याशिवाय, कारची देखभाल कशी केली गेली आहे हे पाहण्यासाठी सर्व्हिस हिस्ट्री तपासा. शेवटी, गाडीवर कोणतीही थकबाकी किंवा कर्ज नाही याची खात्री करण्यासाठी एनओसी (NOC) आणि पावत्या तपासा.खरेदीनंतर, आरसी (RC) तुमच्या नावावर झाल्याची खात्री करा. खरेदीचे बिल घ्यायला विसरू नका, ज्यामध्ये गाडीची मूळ किंमत आणि मालकीचा इतिहास कळतो.

इंटीरियर आणि इलेक्ट्रॉनिक्स

कारमध्ये बसून एसी, म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडोज आणि लाईट्स चेक करा. जेणेकरून सर्वकाही व्यवस्थित काम करत असल्याची खात्री होईल. तसेच डॅशबोर्डची स्वच्छता तपासा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजचे ओडोमीटर चेक करा. कार किती चालली आहे हे पाहण्यासाठी ते तपासा. परंतु, आजकाल ते बदलले जाऊ शकते, म्हणून सर्व्हिस रेकॉर्डद्वारे याची पडताळणी करा.

CNG Kit Price : पेट्रोल कारला CNG किट बसवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Web Title: Second hand used car buying tips documents checklist marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Car
  • car buying tips
  • Second Hand

संबंधित बातम्या

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
1

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
2

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ
3

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ

‘मेड इन इंडिया’ मिनी कंट्रीमॅनसी भारतात सादर; किंमत घ्या जाणून सविस्तर
4

‘मेड इन इंडिया’ मिनी कंट्रीमॅनसी भारतात सादर; किंमत घ्या जाणून सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.