Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?

१९३४ मधील एका रेसमध्ये ७५० ग्रॅम वजनाचा कडक नियम पाळण्यासाठी मर्सिडीजने आपल्या कारचा पांढरा रंग एका रात्रीत खरवडून थेट अल्युमिनियमचे चकाकणारे बॉडीवर्क उघडे केले. या अगतिकतेतून जन्माला आलेली चांदेरी कार ती रेस जिंकली आणि तिथूनच मर्सिडीजच्या आयकॉनिक 'सिल्व्हर ॲरो' रंगाचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 22, 2026 | 09:24 PM
रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?
Follow Us
Follow Us:

आजच्या काळात मर्सिडीज-बेंझ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा राजेशाही ‘सिल्व्हर’ रंग. हा रंग मर्सिडीजच्या केवळ गाड्यांचीच नाही, तर त्यांच्या फॉर्म्युला वन रेसिंग टीमचीही जागतिक ओळख आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा आयकॉनिक रंग कोणत्याही डिझायनरने विचार करून बनवला नव्हता, तर १९३४ मध्ये एका रेस जिंकण्यासाठी आणि वजनाचा नियम पाळण्यासाठी लागलेल्या एका रात्रीच्या अगतिकतेतून या रंगाचा जन्म झाला होता.

१९३४ चा तो कडक नियम

गोष्ट आहे जून १९३४ मधील. जर्मनीतील प्रसिद्ध ‘नर्बरिंग’  ट्रॅकवर ‘इंटरनॅशनल आयफेल रेस’ आयोजित करण्यात आली होती. या रेससाठी आंतरराष्ट्रीय संघटनेने एक नवा आणि कडक नियम लागू केला होता. नियमानुसार, रेसमध्ये भाग घेणाऱ्या कारचे वजन (इंधन, तेल आणि टायरशिवाय) ७५० किलोपेक्षा जास्त नसावे. हा नियम गाड्यांचा वेग आणि अपघात नियंत्रणात ठेवण्यासाठी बनवला गेला होता.

FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

मर्सिडीजचे वाढलेले वजन

मर्सिडीज कंपनीने या रेससाठी आपली नवीन आणि शक्तिशाली कार ‘W25’ तयार केली होती. रेसच्या आदल्या दिवशी म्हणजेच २ जून १९३४ रोजी जेव्हा या कारचे अधिकृत वजन करण्यात आले, तेव्हा मर्सिडीजच्या टीमचे धाबे दणाणले. मर्सिडीज कारचे वजन ७५१ किलोग्रॅम भरले होते, म्हणजेच नियमापेक्षा अवघे किलोभर जास्त!

केवळ १ किलो वजन जास्त असल्यामुळे मर्सिडीज रेसधून बाद होणार होती. कारमधील इंजिन किंवा इतर कोणताही तांत्रिक भाग काढून वजन कमी करणे शक्य नव्हते, कारण त्यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असता.

‘अल्फ्रेड नेबॉर‘ यांची आयडिया आणि ती ऐतिहासिक रात्र

मर्सिडीज रेसिंग टीमचे मॅनेजर ‘अल्फ्रेड नेबॉर’ आणि त्यांचा मुख्य ड्रायव्हर ‘मॅनफ्रेड फॉन ब्रॉचिट्स’ रात्री विचार करत बसले होते की वजन कसे कमी करावे. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.

त्या काळात जर्मनीच्या रेसिंग गाड्यांचा अधिकृत रंग ‘पांढरा’ असायचा जसे इटलीचा लाल आणि ब्रिटनचा हिरवा असायचा. मर्सिडीजच्या कारवरही पांढऱ्या रंगाचा जाड थर होता. नेबॉर यांनी विचार केला की जर आपण हा पूर्ण रंगच काढून टाकला तर?

त्या रात्री मर्सिडीजचे मेकॅनिक्स आणि कारागीर गॅरेजमध्ये एकत्र आले. त्यांनी हाताने स्क्रॅपर घेऊन संपूर्ण कारचा पांढरा रंग खरवडण्यास सुरुवात केली. रात्रभर चाललेल्या अथक परिश्रमानंतर कारचा संपूर्ण रंग काढून टाकण्यात आला. आता कारवर कोणताही रंग नव्हता, तर केवळ कारचे मूळ अल्युमिनियमचे चकाकणारे ‘बॉडीवर्क’ उघडे पडले होते.

तलवारीच्या पकडीवरून ठरला भारतीय गाड्यांच्या ‘स्टीअरींगचा’ नियम! जाणून घ्या ‘राईट हँड ड्राईव्ह’चा इतिहास!

‘सिल्व्हर ॲरो‘चा जन्म आणि ऐतिहासिक विजय

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कारचे पुन्हा वजन करण्यात आले, तेव्हा ते तंतोतंत ७५० किलो भरले. मर्सिडीज कार रेससाठी पात्र ठरली!

रंग नसल्यामुळे ती अल्युमिनियमची चांदेरी कार जेव्हा ट्रॅकवर उतरली, तेव्हा ती एखाद्या चांदीच्या बाणासारखी चमकत होती. मॅनफ्रेड फॉन ब्रॉचिट्स यांनी ती कार अतिशय वेगाने पळवून ती रेस जिंकली. वर्तमानपत्रांनी आणि प्रेक्षकांनी त्या चकाकणाऱ्या चांदेरी गाड्यांना ‘सिल्व्हर ॲरो’ असे नाव दिले.

किलोभर वजनाचा नियम पाळण्यासाठी मर्सिडीजने जे अगतिक पाऊल उचलले, त्याने ऑटोमोबाईल जगताला त्यांचा सर्वात लोकप्रिय रंग दिला. एका रात्रीत पांढरा रंग खरवडून सुरू झालेला हा प्रवास आज मर्सिडीज ब्रँडची सर्वात मोठी प्रतिष्ठा आणि ओळख बनला आहे!

Web Title: Silver arrow mercedes benz history auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mercedes car

संबंधित बातम्या

कस्टमाईझ आवडीचा रंग देण्यासाठी, कार कंपन्या लाखो रुपये का आकारतात? रंगांची एक्सक्लुझिव्हिटी ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवते? जाणून घ्या
1

कस्टमाईझ आवडीचा रंग देण्यासाठी, कार कंपन्या लाखो रुपये का आकारतात? रंगांची एक्सक्लुझिव्हिटी ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवते? जाणून घ्या

रोल्स रॉयसच्या पुढच्या ग्रिलचा आकार त्यांच्या ब्रँडची ओळख कसा बनला?ग्रीक मंदिर वास्तूचे ‘स्टेटस सिम्बॉल’मध्ये कसे रूपांतर झाले?
2

रोल्स रॉयसच्या पुढच्या ग्रिलचा आकार त्यांच्या ब्रँडची ओळख कसा बनला?ग्रीक मंदिर वास्तूचे ‘स्टेटस सिम्बॉल’मध्ये कसे रूपांतर झाले?

तलवारीच्या पकडीवरून ठरला भारतीय गाड्यांच्या ‘स्टीअरींगचा’ नियम! जाणून घ्या ‘राईट हँड ड्राईव्ह’चा इतिहास!
3

तलवारीच्या पकडीवरून ठरला भारतीय गाड्यांच्या ‘स्टीअरींगचा’ नियम! जाणून घ्या ‘राईट हँड ड्राईव्ह’चा इतिहास!

टायरचा रंग नेहमी काळाच का असतो? जाणून घ्या यामागचे रंजक तथ्य!
4

टायरचा रंग नेहमी काळाच का असतो? जाणून घ्या यामागचे रंजक तथ्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.