Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही

सिम्पल एनर्जीने आपली नवी 'सिम्पल व्हेव' इलेक्ट्रिक स्कूटर भारतात १.०९ लाख रुपये या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. ५ kWh पर्यंतच्या बॅटरी पर्यायांसह २४३ किमी रेंज, ९० किमी प्रतितास वेग, ७० लिटर स्टोरेज आणि फास्ट चार्जिंग ही या आधुनिक फॅमिली स्कूटरची मुख्य वैशिष्ट्ये असून डिलिव्हरी सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 04, 2026 | 08:00 AM
Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही
Follow Us
Follow Us:
  • सिम्पल व्हेव ई-स्कूटर १.०९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच, २४३ किलोमीटरपर्यंत मिळणारे तगडे रेंज.
  • तब्बल ७० लिटरची अफाट स्टोरेज क्षमता आणि चार विविध बॅटरी पर्यायांसह ५ kWh ची मोठी बॅटरी.
  • ९० किमी प्रतितास टॉप स्पीड, फास्ट चार्जिंग सुविधा आणि आधुनिक ७-इंच TFT स्मार्ट कनेक्टिव्हिटी डिस्प्ले.

सिम्पल एनर्जीने आपली पहिली फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘सिम्पल व्हेव’ भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सादर केली आहे. ही स्कूटर तीन प्रमुख व्हेरियंट्स आणि सहा ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याची सुरुवातीची प्राारंभिक किंमत १,०९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप-स्पेक्ट ‘सिम्पल व्हेव प्लस’ मॉडेलमध्ये ५ kWh ची बॅटरी, २४३ किमीची IDC रेंज आणि ९० किमी प्रतितास असा  वेग मिळतो. या स्कूटरची डिलिव्हरी सप्टेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल.

७० लिटरची प्रचंड स्टोरेज क्षमता आणि उत्तम डिझाइन

युजेबिलीटी लक्षात घेता या स्कूटरमध्ये तब्बल ७० लिटरची स्टोरेज जागा देण्यात आली आहे, जी तीन भागात विभागली आहे. यात सीटखाली ६३ लिटरची मुख्य जागा, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिलेली ४ लिटरची ‘पिल’ ऑक्झिलरी स्टोरेज आणि ३ लिटरचा ग्लोव्ह बॉक्स समाविष्ट आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये १३४७ मिमीचा व्हीलबेस, १५० किलोची वजन वाहून नेण्याची क्षमता, ७७५ मिमी सीटची उंची आणि १७५ मिमी ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. ही स्कूटर ३०० मिमी खोल पाण्यात सहज चालू शकते.

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

बॅटरी, इंजिन आणि रेंज पर्याय

ग्राहकांसाठी ५ kWh, ३.७ kWh, २.७ kWh आणि २.२ kWh असे चार बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. ५ kWh क्षमतेची बॅटरी २४३ किमी रेंज देते, तर ३.७ kWh बॅटरी १७१ किमी, २.७ kWh बॅटरी १३२ किमी आणि २.२ kWh बॅटरी ११० किमीची IDC रेंज देते. टॉप मॉडेलमधील ५ kWh ची बॅटरी ६.४ kW च्या PMSM मोटरशी जोडलेली आहे, जी १७९ Nm टॉर्क निर्माण करते.

फीचर्स, डिस्प्ले आणि चार्जिंग सुविधा

स्कूटरमध्ये व्हेरियंटनुसार ७-इंच TFT किंवा ५-इंच EBN डिस्प्ले देण्यात आला आहे. TFT स्क्रीन असलेल्या मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन, GPS, कॉल व म्युझिक कंट्रोल आणि OTA अपडेट्स मिळतात. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, हिल-होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड आणि LED लाईटिंग यांसारखे फीचर्सही यात समाविष्ट आहेत. चार्जिंगबाबत बोलायचे तर, फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही स्कूटर ० ते ८० टक्के फक्त २ तास १५ मिनिटांत चार्ज होते.

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

वेगाने वाढणारे नेटवर्क आणि बुकिंग

सिम्पल व्हेव स्कूटरचे बुकिंग देशभरातील ७५ पेक्षा जास्त शोरूम्समध्ये सुरू झाले आहे. कंपनीची सध्याची प्रोडक्शन क्षमता दरमहा ३,००० युनिट्स असून, मार्च २०२७ पर्यंत ही विक्री दरमहा १०,००० युनिट्सपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Simple wave electric scooter launched in india price range features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • automobile
  • scooter
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
2

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
3

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
4

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.