Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाला ‘टॉप ऑटोमोबाईल एक्सपोर्टर’चा सन्मान; २०२५-२६ मध्ये ४० हजारांहून अधिक वाहनांच

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया (SAVWIPL) ला २०२५-२६ आर्थिक वर्षात मुंबई पोर्टमार्गे ४० हजारांहून अधिक वाहनांची निर्यात केल्याबद्दल ‘ऑटोमोबाईल: टॉप एक्सपोर्टर’ पुरस्कार मिळाला. कंपनीने आतापर्यंत भारतात निर्मित ७.२५ लाखांहून अधिक वाहने जगभरातील अनेक देशांमध्ये निर्यात केली आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 17, 2026 | 08:54 PM
मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाला ‘टॉप ऑटोमोबाईल एक्सपोर्टर’चा सन्मान; २०२५-२६ मध्ये ४० हजारांहून अधिक वाहनांच
Follow Us
Follow Us:

भारताला जागतिक वाहन उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ला मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून ‘ऑटोमोबाईल: टॉप एक्सपोर्टर’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान मुंबई बंदरातून ४० हजारांहून अधिक वाहनांची निर्यात केल्याबद्दल कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला.

यापूर्वीही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ‘टॉप एक्सपोर्टर’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे सलग उत्कृष्ट निर्यात कामगिरीची परंपरा कायम ठेवत SAVWIPL ने भारतीय वाहन उद्योगातील आपले महत्त्व अधिक दृढ केले आहे.

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात निर्मित ७ लाख २५ हजारांहून अधिक वाहनांची निर्यात केली आहे. ही वाहने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व (मिडल ईस्ट) तसेच उत्तर अमेरिका यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचली आहेत. यामुळे भारतातील उत्पादन क्षमतेवर जागतिक ग्राहकांचा वाढता विश्वासही अधोरेखित झाला आहे. SAVWIPL च्या निर्यात पोर्टफोलिओमध्ये फोक्सवॅगन टायगुन, फोक्सवॅगन व्हर्टस, स्कोडा कुशाक आणि स्कोडा स्लाव्हिया या लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे. ही सर्व वाहने ‘फुली बिल्ट युनिट्स’ (CBU) स्वरूपात विविध देशांमध्ये पाठवली जातात. याशिवाय कंपनी आता वाहनांचे सुटे भाग आणि घटकांची (Components) निर्यातही वाढवत आहे. या भागांचा वापर निवडक देशांतील असेंब्ली ऑपरेशन्ससाठी केला जात असून, त्यामुळे भारताची भूमिका फोक्सवॅगन समूहाच्या जागतिक पुरवठा साखळीत अधिक मजबूत होत आहे.

2026 स्कोडा कोडियाक भारतात लॉन्च; आता मिळणार अधिक सेफ्टी फीचर्स आणि प्रगत ADAS, इंजिन आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना SAVWIPL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्हणाले की, “मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून पुन्हा एकदा सन्मानित होणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारतातील आमची उत्पादन व्यवस्था आता समूहासाठी जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित झाली आहे. भविष्यातही भारताचे जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळीतील स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

फोक्सवॅगन समूहाचा भाग असलेली ही कंपनी जागतिक बाजारपेठेतील मागणी आणि बदलत्या नियमांनुसार नवीन निर्यात संधींचा शोध घेत आहे. नुकतीच श्रीलंका बाजारपेठेत झालेली कंपनीची एंट्री ही तिच्या प्रादेशिक विस्तार धोरणातील आणखी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. भारतातून जगभर वाहन निर्यात वाढविण्यात SAVWIPL चे योगदान आगामी काळात आणखी महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Skoda auto volkswagen india honoured as top automobile exporter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • Skoda Auto
  • Volkswagen

संबंधित बातम्या

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: पेट्रोलला टक्कर देणारं इथेनॉल! 85% इथेनॉलवर धावणारी Wagon R कितीला मिळणार?
1

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: पेट्रोलला टक्कर देणारं इथेनॉल! 85% इथेनॉलवर धावणारी Wagon R कितीला मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.