फोटो सौजन्य: @MotorBeam (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राची व्याप्ती ही खूप मोठी आहे. त्यामुळेच तर जगभरातील ऑटो कंपन्या इथे आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी या कंपन्या भारतीय ग्राहकांना बेस्ट फीचर्ससह दमदार परफॉर्मन्स असणाऱ्या कार ऑफर करत असतात. स्कोडा कंपनी सुद्धा देशात काही वर्षांपासून ग्राहकांसाठी बेस्ट कार्स उपलब्ध करून देत आहे.
आता स्कोडा आपली नवीन एसयूव्ही Skoda Kodiaq भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही कधी लाँच होणार? आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या टीझरमधून काय माहिती समोर आली आहे? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Tata Motors मार्केटमध्ये अजून एक भन्नाट EV आणण्याच्या तयारीत, मिळणार प्रीमियम फीचर्स
स्कोडाने त्यांच्या आगामी एसयूव्ही स्कोडा कोडियाकसाठी एक टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमधून कारच्या अनेक डिझाइन आणि फीचर्सबाबत थोडक्यात माहिती मिळाली आहे.
Grander. Bolder. More indulgent than ever, get ready to experience a masterpiece in motion. Stay tuned. ✨#SkodaIndia #LetsExplore #SkodaKodiaq pic.twitter.com/ZSWGtFI7l4
— Škoda India (@SkodaIndia) April 5, 2025
सुमारे 13 सेकंदांचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोडियाक एसयूव्हीच्या एक्सटिरिअरसोबत इंटिरिअरची झलक देखील दिसते. या व्हिडिओत पॅनोरॅमिक सनरूफ, आकर्षक टेलगेट डिझाइन, एलईडी टेल लाइट्स आणि आधुनिक डॅशबोर्ड यांसारखी फीचर्स पाहायला मिळतात. या टिझरमधून अंदाज बांधता येतो की, ही एसयूव्ही डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत एक प्रीमियम ऑप्शन ठरणार आहे.
स्कोडा द्वारे कोडियाकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येईल. एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, एलईडी रियर लाईट, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 13 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँबियंट लाईट्स, 19 आणि 20 इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल असे अनेक उत्तम फीचर्स यामध्ये दिले जाऊ शकतात.
BMW च्या ‘या’ दोन बाईक्स मार्केटमध्ये टोटल बंद ! 7 वर्षाचा प्रवास संपला, पण नेमकं कारण काय?
या एसयूव्हीच्या लाँचिंगबाबत स्कोडाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण असे मानले जाते की ही एसयूव्ही एप्रिल 2025 मध्ये किंवा मे 2025 च्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते.
कोडियाक ही स्कोडा फुल साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच करेल. या सेगमेंटमध्ये, ते टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करेल. याशिवाय, एप्रिल 2025 मध्ये लाँच होणाऱ्या फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइनशीही स्पर्धा होईल.
नवीन एसयूव्हीची नेमकी किंमत स्कोडा लाँचिंगच्या वेळी जाहीर करण्यात येईल. परंतु अशी अपेक्षा आहे की नवीन कोडियाक भारतात सुमारे 40 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते.