फोटो सौजन्य: @cbdhage (X.com)
टाटा मोटर्सशिवाय भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही अपूर्ण आहे. आज देशात जास्तीतजास्त ग्राहक जेव्हा आपली नवीन कार खरेदी करायला जातात तेव्हा त्यांची पहिली पसंत ही टाटा मोटर्सलाच असते. टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी EV ला असणारी वाढती मागणी पाहून इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे.
टाटा मोटर्सने अलीकडेच इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये त्यांची आगामी एसयूव्ही, Tata Sierra, शोकेस केली होती. पण, आता कंपनी या कारच्या लाँचसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. ही एसयूव्ही दोन व्हेरियंटमध्ये येईल, एक ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) आणि दुसरा EV (इलेक्ट्रिक व्हेईकल).
40 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा विकत घेईल MG Windsor EV, फक्त ‘एवढा’ असेल EMI?
माहितीनुसार, टाटा सिएरा ईव्ही प्रथम लाँच केली जाईल, त्यानंतर आयसीई व्हर्जन येईल. टाटा मोटर्स या कारला त्यांची प्रमुख एसयूव्ही म्हणून स्थान देत आहे, जी ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि होंडा एलिव्हेट सारख्या कारशी स्पर्धा करणार आहे.
टाटा सिएराच्या ICE व्हर्जनमध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 168bhp पॉवर आणि 280Nm टॉर्क जनरेट करेल, ज्यामुळे ही कार अधिक पॉवरफुल बनेल.
टाटाची Turbo Petrol Series अल्ट्रोझ आणि नेक्सॉनमध्ये आधीच यशस्वी झाली आहे. आता सिएरामध्ये त्याची अपग्रेडेड व्हर्जन दिले जाऊ शकते. दुसरीकडे, सिएरा ईव्ही एका डेडिकेटेड इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. कंपनीने त्यांच्या बॅटरी पॅक किंवा मोटर स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की ही ईव्ही सुमारे 450-500 किमीची रेंज देऊ शकते.
टाटा सिएराचे डिझाइन त्याच्या सर्वात मोठ्या यूएसपींपैकी एक असेल, जे या कारला इतर मध्यम आकाराच्या एसयूव्हींपेक्षा वेगळी बनवते. त्याच्या एक्सटिरिअर स्प्लिट एलईडी हेडलॅम्प, फ्लश डोअर हँडल, 19-इंच अलॉय व्हील्स आणि एंड-टू-एंड टेल लाईट स्ट्रिप सारख्या आकर्षक फीचर्सचा समावेश असेल.
April 2025 मध्ये Hyundai Venue SUV वर मिळत आहे ताबडतोड डिस्काउंट
या कारच्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-टोन थीम डॅशबोर्ड, आधुनिक स्टीअरिंग व्हील आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारखी फीचर्स आढळू शकतात. एवढेच नाही तर, टाटा सिएरामध्ये एआय-बेस्ड व्हॉइस असिस्टंट आणि ओटीए (ओव्हर-द-एअर) अपडेट्स सारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्मार्ट एसयूव्ही म्हणून त्याची ओळख मजबूत होईल.
ही Tata Sierra ह्युंदाई क्रेटा 2024, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा – सोबत थेट स्पर्धा करेल. या सर्व एसयूव्ही त्यांच्या संबंधित सेगमेंटमध्ये त्यांच्या मजबूत ब्रँड व्हॅल्यू, प्रीमियम फीचर्स आणि उत्तम इंजिनसाठी ओळखल्या जातात.